‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा
आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमी संघाला विजेतेपद !!
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमीने ३०६ धावांचे लक्ष्य उभे केले. आर्दश रावल याने ८२ चेंडूमध्ये १७ चौकारांसह १०२ धावांची खेळी केली. त्याला सार्थक ढमढेरे (६५ धावा) आणि शौनक शेवडे (४६ धावा), विरेंद्र सिंग (४६ धावा) आणि स्वराज चव्हाण (३२ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. स्वराज आणि शौनक यांनी ११४ चेंडूत ८५ धावांची सलामी देत संघाला भक्कम सुरूवात करून दिली. त्यामुळे संघाला ३०० धावांचे लक्ष्य उभे करता आले. याला उत्तर देताना स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमीचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. आरूष सिंग याने ६९ धावांची तर, यशोवर्धन पी. याने ५५ धावांची खेळी करून प्रतिकार केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण लायन्स् क्लबचे ला. विजय शितोळे, कार आर्टचे तुषार शिंदे, नोबल डेंटल क्लिनिकचे डॉ. प्रवेश जठार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी आणि अमित काळे उपस्थित होते. विजेत्या आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमीला आणि उपविजेत्या स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमीला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमीः ४८ षटकात ३ गडी बाद ३०६ धावा (आर्दश रावल १०२ (८२, १७ चौकार), सार्थक ढमढेरे ६५ (४१, ८ चौकार, २ षटकार), शौनक शेवडे ४६, विरेंद्र सिंग ४६, स्वराज चव्हाण ३२, वीर चोरडीया २-४८);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी स्वराज आणि शौनक यांच्यामध्ये ८५ (११४) वि.वि. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमीः ४२ षटकात १० गडी बाद २१७ धावा (आरूष सिंग ६९ (८३, ८ चौकार), यशोवर्धन पी. ५५ (७१, ८ चौकार), निशांत शेवाळे ३०); सामनावीरः आर्दश रावल;
वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः शिवम गोरे (विजय क्रिकेट अॅकॅडमी, २८० धावा आणि ८ विकेट);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः सार्थक ढमढेरे (आर्यन्स् अॅकॅडमी, ४०४ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः रझाक शेख (एसएम अॅकॅडमी, ९ विकेट);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः धु्रविल रैथाठा (स्पार्क स्पोर्टीव्ह अॅकॅडमी);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः स्वराज चव्हाण (आर्यन्स् अॅकॅडमी);
फेअर प्ले अवॉर्डः स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी;
फोटो ओळीः स्पर्धेतील विजेता आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमीचा संघ करंडकासह.
