स्पर्धेत महाराष्ट्रातून सहभागी होणारा पुण्यातील एकमेव रेसिंगपटू !!

पुणे, दि. ७ जुलैः इंडोनेशियामध्ये होणाऱ्या एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीमध्ये पुण्यातील १९ वर्षीय आणि टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण मौसमातील दुसऱ्या फेरीच्या रेसमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीचा दावेदार ठरत आहे. थायलंमधील दुसऱ्या फेरीत सार्थकने विजेतेपदाला गवणसी घातली होती आणि स्पर्धेत तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू ठरला होता. हि चौथी फेरी रविवार, ९ जुलै रोजी होणार आहे.

स्पर्धेच्या मलेशियातील मौसमाच्या पहिल्याच फेरीमध्ये सार्थक ‘पोडीयम विजेता‌’ ठरला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये थायलंडमधील बुरिराम येथील ‘चांग इंटरनॅशनल सर्किट‌’ येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरलेल्या सार्थक याने आपल्या कामगिरीने आपला दावा ‘सार्थ‌’ करून दाखविला. आता इंडोनेशियामध्ये चौथ्या फेरीसाठी सार्थक सज्ज झाला आहे.

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

लढतीआधी बोलताना सार्थक म्हणाला की, दुसऱ्या फेरीतील विजेतेपदामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे. तिसऱ्या फेरीत सहभागी झालो नाही कारण मी स्पेनमध्ये आणि फ्रान्स्‌मध्ये झालेल्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद शर्यतीमध्ये सहभागी होतो. आता मला पुन्हा एकदा उत्तम कामगिरी करायची आहे पण, त्याचे मला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवत नाही. थायलंडमधील माझ्या कामगिरीबद्दल मी खूपच समाधानी आहे. मानसिकदृष्ट्या सजग राहून महत्वाच्या गोष्टींवर सातत्याने काम करावे, याकडेच माझे संपूर्ण लक्ष्य केंद्रीत आहे. सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!