Swaraj More
‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धा !!
पुणे क्रिकेट अॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी, एसएआरके क्रिकेट अॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !
Virat Bhise
पुणे, ३१ डिसेंबरः ट्वेन्टीफोर स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धेत पुणे क्रिकेट अॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी आणि एसएआरके क्रिकेट अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विराट भिसे याने केलेल्या नाबाद ७५ धावांच्या खेळीमुळे पुणे क्रिकेट अॅकॅडमीने मॅव्हरीक्स् क्रिकेट अॅकॅडमीचा ७९ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या पुणे क्रिकेट अॅकॅडमीने २२ षटकात २०७ धावांचे आव्हान उभे केले होते. विराट भिसे याने नाबाद ७५ धावांची आणि आदित्य मोहीते याने ६० धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना मॅव्हरीक्स् क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १२८ धावांवर मर्यादित राहीला.
स्वराज मोरे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमीने एके क्रिकेट अॅकॅडमीचा ८७ धावांनी सहज पराभव केला. रतम सेन (९२ धावा) आणि स्वराज मोरे (५१ धावा) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमीने २१६ धावांचे लक्ष्य उभे केले होते. याला उत्तर देताना एके क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १२९ धावांवर आटोपला. ओंकार परब याने केेलेल्या नाबाद ५७ धावांच्या जोरावर एसएआरके क्रिकेट अॅकॅडमीने योगेश इलेव्हन अॅकॅडमीचा ७ गडी राखून पराभव केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे क्रिकेट अॅकॅडमीः २२ षटकात १ गडी बाद २०७ धावा (विराट भिसे नाबाद ७५ (६२, १० चौकार, १ षटकार), आदित्य मोहीते ६० (३१, ९ चौकार, २ षटकार), यश दराडे ३२, युगांक भालेराव १-२८) वि.वि. मॅव्हरीक्स् क्रिकेट अॅकॅडमीः २२ षटकात ७ गडी बाद १२८ धावा (अर्जुन तेलंग २७, विहान वानखेडे २१, समर्थ कदम २-११); सामनावीरः विराट भिसे;
ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमीः २५ षटकात ३ गडी बाद २१६ धावा (रितम सेन ९२ (६८, १३ चौकार), स्वराज मोरे ५१ (३९, ९ चौकार), स्वर नागवडे ४०) वि.वि. एके क्रिकेट अॅकॅडमीः २४.२ षटकात १० गडी बाद १२९ धावा (अमन माने २५, समिक सावंत २२, सृष्टी भांगे १६, स्वराज मोरे ३-१०, प्रणय आवळे २-२५); सामनावीरः स्वराज मोरे;
योगेश इलेव्हन अॅकॅडमीः १७ षटकात ८ गडी बाद ११२ धावा (श्रृतिका पाटील ५० (३५, ६ चौकार, १ षटकार), अव्दिका जाधव २५, माही सुंकाळे ४-२०, संस्कार भुजबळ २-२५) पराभूत वि. एसएआरके क्रिकेट अॅकॅडमीः १६.१ षटकात ३ गडी बाद ११३ धावा (ओंकार परब नाबाद ५७ (३९, ९ चौकार), संस्कार भुजबळ नाबाद १७, सई जोंधळे १-१९); सामनावीरः ओंकार परब.


