• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा

आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

 

पुणे, १७ नोव्हेंबरः स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत स्वराज चव्हाण याने केलेल्या शतकी खेळीमुळे आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने एलिट ईगल्स्चा ५९ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ५० षटकात २८७ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये स्वराज चव्हाण याने ९७ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह १०९ धावांची खेळी केली. सार्थक ढमढेरे याने ५४ धावांचे योगदान दिले. या आव्हानासमोर एलिट ईगल्स् संघाने ४५.३ षटकामध्ये २२८ धावा केल्या. वेदांत देवहाडे याने लढा देताना ८१ धावांची खेळी साकारली.

दुसर्‍या सामन्यामध्ये मितेश दमानी याने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीने टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमीचा १७५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २३८ धावा धावफलकावर लावल्या. सुमित बनसोडे याने ६३ धावांची तर, युवराज पाटील याने ५२ धावांची खेळी केली. या लक्ष्यासमोर टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमीचा डाव ६३ धावांवर गडगडला. स्पार्क संघाच्या आर्यन गुर्जर याने ३ गडी बाद केले. मितेश दमानी याने १३ धावात २ तर, आर्यन नासिर याने १० धावांमध्ये २ गडी टिपत संघाला मोठा विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ५० षटकात ७ गडी बाद २८७ धावा (स्वराज चव्हाण १०९ (९७, १३ चौकार, ३ षटकार), सार्थक ढमढेरे ५४ (६२, ७ चौकार), सार्थक पाटील २६, आर्दश रावल नाबाद २६, अर्णव पाटील २-७३, श्रीनिवास गाडे २-४३) वि.वि. एलिट ईगल्स्ः ४५.३ षटकात ९ गडी बाद २२८ धावा (वेदांत देवहाडे ८१ (७८, १० चौकार), सुयश मोरे ३०, विहान केंजळे २६, शौनक शेवडे ३-१३, कृष्णा पटेल २-३९, सार्थक पाटील २-४४); सामनावीरः स्वराज चव्हाण;

स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ४५.४ षटकात १० गडी बाद २३८ धावा (सुमित बनसोडे ६३ (८२, ८ चौकार), युवराज पाटील ५२ (७०, ९ चौकार), आझाद शेख २-२३, अमोघ रोडगे २-४२) वि.वि. टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमीः १७ षटकात १० गडी बाद ६३ धावा (अमोघ रोडगे १६, आर्यन गुर्जर ३-१, मितेश दमानी २-१३, आर्यन नासिर २-१०); सामनावीरः मितेश दमानी;

 

फोटो ओळीः आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि एलिट ईगल्स् यांच्या सामन्यातील क्षण.
फोटो १ आणि २: आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा शौनक शेवडे, फलंदाज एलिट ईगल्स्चा गोलंदाज अमोघ गायकवाड याच्या गोलंदाजीवर फटका मारताना.

 

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!