• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Adiraj Gote

वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ट्रिनिटी स्पोटर्स अ‍ॅकॅडमी संघांचा तिसरा विजय !!

पुणे, १२ नोव्हेंबरः एसए-आरके अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘एसए-आरके अजिंक्यपद करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट (२५ षटके) स्पर्धेत वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि ट्रिनिटी स्पोटर्स अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला.

मांजरी येथील पीजी क्रिकेट मैदान आणि हांडेवाडी येथील एसए-आरके अ‍ॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अदिराज गोटे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने आर्यन्स् अ‍ॅकॅडमीचा ४९ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्‍या वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २५ षटकात १४९ धावांचे आव्हान उभे केले. अदिराज गोटे याने नाबाद ६५ धावांची तर, स्वर नागवडे याने ४० धावांची खेळी केली. या दोघांनी १३२ चेंडूत ११३ धावांची सलामी देत संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १०० धावांवर मर्यादित राहीला. आदिराज याने गोलंदाजीमध्येही २० धावात ३ गडी टिपत अचूक गोलंदाजी केली.

विवान हंसालिया याने झळकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ट्रिनिटी स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने ढोलेपाटील अ‍ॅकॅडमीचा १०२ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्‍या ट्रिनिटी स्पोटर्स अ‍ॅकॅडमीने २०७ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये विवान याने ५१ चेंडूत २१ चौकारांसह १०० धावांची खेळी केली. याशिवाय गुरू राजोले (४७ धावा) आणि शौर्य सावंत (३८ धावा) यांनीही विवान याला दुसर्‍या बाजूने उत्तम साथ दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना ढोलेपाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १०५ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात १ गडी बाद १४९ धावा (अदिराज गोटे नाबाद ६५ (८३, ८ चौकार, १ षटकार), स्वर नागवडे ४०);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी अदिराज आणि स्वर यांच्यामध्ये ११३ (१३२) वि.वि. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २१ षटकात १० गडी बाद १०० धावा (सार्थ बदाडे २९, आदिराज गोटे ३-२०, नील कामठे २-१४, सुरश्री धिवर २-१६); सामनावीरः अदिराज गोटे;

ट्रिनिटी स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः २२ षटकात ४ गडी बाद २०७ धावा (विवान हंसालिया १०० (५१, २१ चौकार), गुरू राजोले ४७, शौर्य सावंत ३८, इशान अरनेजा २-२९); (भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी विवान आणि शौर्य १३३ (७७) वि.वि. ढोलेपाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २२ षटकात ९ गडी बाद १०५ धावा (कार्तिक पाल २४, आर्यन खेडकर १९, इशान अरनेजा १६, सुजल राणे २-३, सम्राट बोदाडे २-११); सामनावीरः विवान हंसालिया.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!