‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे १३ नोव्हेंबरपासून आयोजन !!
पुणे, ११ नोव्हेंबरः स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे दुसऱ्या ‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीच्या मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक आणि स्पर्धेचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, सध्या पुणे शहरांमध्ये २०-ट्ेवेन्टी किंवा २५-२५ मार्यदित षटकांच्या स्पर्धांचे आयोजन होताना दिसते. पण जास्तीच्या षटकांच्यां सामन्यांमध्ये खेळाडू आणि संघ म्हणून अधिक कस आणि गुणवत्ता पणाला लागते. म्हणून आम्ही १७ वर्षाखालील वयोगटासाठी ही एक-दिवसीय म्हणजेच ५०-५० षटकांचे सामने असलेली स्पर्धा आयोजित करत आहोत. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या आंतरक्लब स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटातील एकूण १० निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत बीएस्पोटर्स एबीव्ही अॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी ब संघ, ए.एम क्रिकेट अॅकॅडमी, स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमी, विजय क्रिकेट अॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमी, एलिट ईगल्स् अॅकॅडमी, स्पार्क क्रिकेट अॅकॅडमी, टेंभेकर फार्म्स, स्पेशलाईज्ड् क्रिकेट क्लिनिक या १० निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला करंडक आणि मेडल्स् मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अॅकॅडमी आणि विजय क्रिकेट अॅकॅडमी, या दोन संघांमध्ये होणार आहे.

