पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रूपयांची देणगी सुपूर्त !!

पुणे, ११ मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने सगल दुसर्‍या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजक श्री. पुनितदादा बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन आणि धारीवाल फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते ५ लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना देण्यात आला. यावेळी पुणे शहर पोलिस दलाचे डीसीपी मिलिंद मोहीते, डीसीपी हिम्मत जाधव, सिनेचित्रपट अभिनेता आकार ठोसर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरोत्सव निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस तास आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व सार्वजनिक उत्सवाचा आनंद घेता येत असतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक  यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुनित बालन ग्रुप संघाने पुने शहर पोलिस संघाचा ५५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १० षटकामध्ये १२३ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये पुनित बालन यांनी नाबाद २६ धावांची खेळी केली. याशिवाय राहूल साठे (३२ धावा), ऋतुराज वीरकर (२७ धावा) आणि आतिश कुंभार (नाबाद २१ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे शहर पोलिस संघाचा डाव ६८ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः
पुनित बालन ग्रुपः १० षटकात ४ गडी बाद १२३ धावा (पुनित बालन नाबाद २६, राहूल साठे ३२, ऋतुराज वीरकर २७, आतिश कुंभार नाबाद २१, प्रशांत गायकवाड २-१५) वि.वि. पुणे शहर पोलिसः १० षटकात ८ गडी बाद ६८ धावा (विपुल गायकवाड नाबाद १७, अभिजीत ढेरे ११, उल्हास कदम १०, कुणाल भिलारे २-८, आदित्य कर्जतकर २-८, अनिकेत कुंभार २-११); सामनावीरः राहूल साठे;

फोटो ओळीः पुनित बालन ग्रुप तर्फे देण्यात येणारा धनादेश स्विकारताना. फोटोमध्ये पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, धारीवाल फाउंडेशनच्या संचालिका शोभाताई धारीवाल, आकाश ठोसर, पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!