‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे १४ फेब्रुवारीला आयोजन !!

पुणे, १० फेब्रुवारीः औद्योगिक बांधकाम क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणार्‍या ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा १४, १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी वारजे येथील स्केलअप क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेत एकूण दोन लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार असून स्पर्धेत दहा संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस्चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे यांनी सांगितले की, औद्योगिक बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचारी आणि खेळाडूंसाठी या स्पर्धेचे गेले सात वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्रात रास करंडक अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा गणली जाते. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून स्पर्धेत १० संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण २ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस या स्पर्धेची उत्कंठा आणि लोकप्रियता वाढत असून स्पर्धेतील उत्साह व्दिगुणीत करण्यासाठी स्पर्धेत नवनवीन गोष्टींचा अंर्तभाव करण्यात येतो. बांधकाम क्षेत्रातील व्यवसायातील खेळीमेळीचे वातावरण राखण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजातून निवांतपणा मिळण्यासाठी तसेच खेळभावना वाढविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे श्री. अनिल हिंगे यांनी स्पष्ट केले.

मिलेनियम इंजिनिरर्स अँड काँट्रॅक्टस, एसकॉन प्रोजेक्टस्, ग्रुप सुर्या, यूनिटी बिल्डटेक, रत्नरूप प्रोजेक्ट्स, आरकॉन पुणे, एसजे कॉन्ट्रॅक्टस्, न्याती इंजिनिअर्स, ऑर्बिटल इलेक् ट्रोमेक आणि क्लासिक इलेक्ट्रिक या १० संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. हे सामने साखळी आणि बाद फेरी या पध्दतीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रूपये पारितोषिक आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये पारितोषिक आणि करंडक देण्यात येणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना करंडक व सन्माचिन्ह तर, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला प्रत्येकी ११ हजार रूपये, करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

सपर्धेच्या करंडकाचे तसेच संघाच्या जर्सीचे दिमाखादार अनावरण सहभागी संघांच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालिका शैला हिंगे, नितीन नाईक, रोहीत जैन, संतोष गायकवाड, निलेश चव्हाण, योगेश वाके, स्वरूप तावडे, दयाशंकर वर्मा, सागर बावधनकर, विनोद नांदापूरकर, महेश पवार, अभिजीत हुंडेकरी, प्रशांत सुरडीकर, किरणकांत धीमन, कुंदन तांबडे आदि मान्यवर उपस्थित होते.

गतवर्षी एसकॉन प्रोजेक्ट्स इलेव्हन संघाने विजेतेपद तर, मिलेनियम इंजीनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स संघाने उपविजेतेपद मिळवले होते.

 
फोटो ओळी: स्पर्धेच्या करंडकाचे अनावरण करताना स्पर्धेतील सहभागी संघाचे कर्णधार व प्रमुख पाहुणे आणि मान्यवर.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!