‘पीडीएफए युथ लीग’ स्पर्धा

 

स्पोटर्स मेनिया क्लब, उत्कर्ष क्रिडा मंच, रायझिंग पुणे एफसी, लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमी, स्टेप ओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमी, यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे, १ फेब्रुवारीः आर. एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या १३ वर्षाखालील गटात स्पोटर्स मेनिया क्लब, उत्कर्ष क्रिडा मंच, रायझिंग पुणे एफसी, लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमी, स्टेप ओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमी आणि यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

रहाटणी येथील स्पोर्टझी अरेना मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत १३ वर्षाखालील गटाच्या सामन्यामध्ये निर्वाण एम. आणि शौर्य एस. यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर स्पोटर्स मेनिया क्लबने मॅथ्युज् फुटबॉल क्लब ब संघाचा २-० असा सहज पराभव केला. दुसर्‍या सामन्यामध्ये उत्कर्ष क्रिडा मंच संघाने फोर लायन्स् रावेत संघाचा ४-० असा पराभव केला. सामन्यामध्ये पर्व शहा, आरव कानल, प्रत्युश गजहाथे आणि शिवांश सोनावणे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये रायझिंग पुणे एफसी संघाने यंग ब्ल्युज् एलिट संघाचा ४-३ असा पराभव केला. रायझिंगकडून प्रखर धर याने २ गोल तर, सावेहीत तानजेन आणि माझेन शेख यांनी प्रत्येकी एक गोल केला. यंग ब्ल्युज् एलिट संघाकडून रिधीत देसाई, गौतम चव्हाण आणि अर्चित सिन्हा यांनी प्रत्येकी एक गोल केला.

देवांश नाईक आणि आर्यन ए. यांनी केलेल्या गोलपूर्ण कामगिरीमुळे अ‍ॅड्रलाईन अ‍ॅकॅडमीने एमएमएफसी संघाचा २-० असा पराभव केला. लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमीने डेक्कन इलेव्हन फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा ४-० असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये आदित टाटी याने २ गोल तर, हर्षवर्धन गोखले आणि अवनेश रोडगे यांनी एकेक गोल केले. एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये स्टेप ओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीने पुणे पायोनिअर्स एफसी संघाचा ६-० असा सहज पराभव केला. यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमीने आर्यन्स् स्पोटर्स फाऊंडेशनचा ७-० असा धुव्वा उडविला.

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः १३ वर्षाखालील गटः
१) स्पोटर्स मेनिया क्लबः २ (निर्वाण एम., शौर्य एस.) वि.वि. मॅथ्युज् फुटबॉल क्लब बः ०;
२) उत्कर्ष क्रिडा मंचः ४ (पर्व शहा, आरव कानल, प्रत्युश गजहाथे, शिवांश सोनावणे) वि.वि. फोर लायन्स् रावेतः ०;
३) रायझिंग पुणे एफसीः ४ (प्रखर धर २ गोल, सावेहीत तानजेन, माझेन शेख) वि.वि. यंग ब्ल्युज् एलिटः ३ (रिधीत देसाई, गौतम चव्हाण, अर्चित सिन्हा);
४) अ‍ॅड्रलाईन अ‍ॅकॅडमीः २ (देवांश नाईक, आर्यन ए.) वि.वि. एमएमएफसीः ०;
५) लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ४ (आदित टाटी २ गोल, हर्षवर्धन गोखले, अवनेश रोडगे) वि.वि. डेक्कन इलेव्हन फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ०;
६) स्टेप ओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ६ (तनिष्क के. विपुल जैन, वरद एम. वझीर फैझ, विरेन भोसले, रूद्रवीर टी. निर्वाण बी.) वि.वि. पुणे पायोनिअर्स एफसीः ०;
७) यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमीः ७ (अब्दुल्लाह खान २, सहास्य जी. २ गोल, विहान टी. २ गोल, वरूण एस.) वि.वि. आर्यन्स् स्पोटर्स फाऊंडेशनः ०;

फोटो ओळीः स्पोटर्स मेनिया क्लब (काळा जर्सी) आणि मॅथ्युज् फुटबॉल क्लब (पांढरा जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!