आठवी ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धा
लौकिक फुटबॉल अॅकॅडमी, कॉन्शट स्पोटर्स पुणे, अॅड्रेलाईन स्पोटर्स, फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी, स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी संघांची शानदार सुरूवात !!
पुणे, दि. ३१ जानेवारीः हॉटफुट स्पोटर्स यांच्या तर्फे आयोजित आठव्या ‘अपोलो हॉटफुट करंडक’ युवा साखळी फुटबॉल स्पर्धेत लौकिक फुटबॉल अॅकॅडमी, कॉन्शट स्पोटर्स पुणे, अॅड्रेलाईन स्पोटर्स, फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमी आणि स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून शानदार सुरूवात केली.
बावधन येथील हॉटफुट अॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये ९ वर्षाखालील गटात कविश नाईक याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर कॉन्शट स्पोटर्स पुणे अ संघाने फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीचा ४-० असा सहज पराभव केला. लौकिक फुटबॉल अॅकॅडमीने सिग्मय फुटबॉल क्लबचा ५-० असा धुव्वा उडविला. लौकिक संघाकडून नचिकेत सोना याने ३ गोल तर, पृथ्वीराज माने याने २ गोल नोंदविले. हर्षित सिंग आणि कबीर एम. या दोघांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर अॅड्रेलाईन स्पोटर्स अ संघाने पुणे सॉकर क्लबचा ६-० असा सहज पराभव केला.
१३ वर्षाखालील गटात ओम शिंदे आणि आरव भार्गवणे यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमीने फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीचा ४-० असा सहज पराभव केला. तन्विश खैरनार याने केलेल्या गोलामुळे स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीने इग्नाईट फुटबॉल क्लबचा १-० असा सहज पराभव केला.
१५ वर्षाखालील गटाच्या सामन्यात पार्थ शिंदे याने केलेल्या गोलांच्या जोरावर मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमीने बीएफसी ब्ल्युज् एलिट्सचा २-० असा सहज पराभव केला. सिद्धांश परदेशी याने केलेल्या गोलपूर्ण कामगिरीमुळे लौकिक फुटबॉल अॅकॅडमीने सिग्मय फुटबॉल क्लबचा १-० असा पराभव केला. धरम गुप्ता याने केलेल्या गोलांमुळे आयओटी लालीगा संघाने ग्रीनबॉक्स् चेतक संघाचा १-० असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः ९ वर्षाखालील गटः
कॉन्शट स्पोटर्स पुणे अः ४ (कविश नाईक ३ गोल, नक्षत्र ओ.) वि.वि. फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीः ०;
लौकिक फुटबॉल अॅकॅडमीः ५ (नचिकेत सोना ३ गोल, पृथ्वीराज माने २) वि.वि. सिग्मय फुटबॉल क्लबः ०;
अॅड्रेलाईन स्पोटर्स अः ६ (हर्षित सिंग ३, कबीर एम. ३ गोल) वि.वि. पुणे सॉकर क्लबः ०;
१३ वर्षाखालील गटः
स्पोटर्स मेनियाः ० बरोबरी वि. आयओटी लालीगाः ०;
फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमीः ४ (ओम शिंदे २, आरव भार्गवणे २ गोल) वि.वि. फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमीः ०;
स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीः १ (तन्विश खैरनार १ गोल) वि.वि. इग्नाईट फुटबॉल क्लबः ०;
१५ वर्षाखालील गटः
मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमीः २ (पार्थ शिंदे २ गोल) वि.वि. बीएफसी ब्ल्युज् एलिट्सः ०;
लौकिक फुटबॉल अॅकॅडमीः १ (सिद्धांश परदेशी) वि.वि. सिग्मय फुटबॉल क्लबः ०;
आयओटी लालीगाः १ (धरम गुप्ता) वि.वि. ग्रीनबॉक्स् चेतकः ०;
फोर लायन्स् फुटबॉल अॅकॅडमीः ४ (आरूष सोनसळे, रोनित मेनन, मिहीर बक्क्षी, वरद कलामुंगे) वि.वि. मेट्रोसिटी फुटबॉल अॅकॅडमीः ०;
फोटो ओळीः
फोटो १: ९ वर्षाखालील गटाच्या कॉन्शट स्पोटर्स पुणे अ (निळा जर्सी) आणि फाल्कन्स् फुटबॉल अॅकॅडमी (हिरवा जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.
फोटो २: १३ वर्षाखालील गटाच्या स्पोटर्स मेनिया (चॉकलेटी जर्सी) आणि आयओटी लालीगा (निळा जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.
फोटो ३: १५ वर्षाखालील गटाच्या मॅथ्युज् फुटबॉल अॅकॅडमी (हिरवा जर्सी) आणि बीएफसी ब्ल्युज् एलिट्स (निळा जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.