• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

‘पीडीएफए लीग’ फुटबॉल स्पर्धा !

सिटी एफसी पुणे, दुर्गा एफसी संघांची विजयी कामगिरी !

पुणे, २ जानेवारीः पुणे जिल्हा फुटबॉल संघटने (पीडीएफए) तर्फे आयोजित ‘पीडीएफए लीग २०२५’ फुटबॉल स्पर्धेच्या व्दितीय श्रेणी गटाच्या सामन्यात सिटी एफसी पुणे आणि दुर्गा एफसी या संघांनी अनुक्रमे एफसी शिवनेरी आणि लिजंड्स युनायटेड या संघांचा पराभव केला.

कात्रज येथील भारती विद्यापीठच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिटी एफसी पुणे संघाने एफसी शिवनेरीचा ६-० असा सहज धुव्वा उडविला. सामन्यामध्ये सात्विक नायक याने गोलांची हॅट्ट्रीक साधली. सात्विक याने ३१ व्या, ३३ व्या आणि ३७ व्या मिनिटाला गोल करून संघाकडून तीन गोल नोंदविले. यासह रायथम मालविया, ललित पाटील आणि अर्थव रेवाळकर यांंनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाची आघाडी ६-० अशी वाढवली.

दुसर्‍या सामन्यामध्ये दुर्गा एफसी संघाने लिजंड्स युनायटेड संघाचा ३-० असा सहज पराभव केला. या सामन्यात मयुर वाघिरे याने सलग तीन गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. साई एफए आणि खडकी ब्ल्युज् यांच्यातील तिसरा सामना १-१ अशी बरोबरी समाप्त झाला. साई संघाकडून हर्ष परीहार याने चौथ्या मिनिटाला गोल करून १-० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात खडकी ब्ल्युज्कडून अर्थव कौसाळकर याने ५० व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली.

सामन्यांचा सविस्तर निकालः व्दितीय श्रेणी गटः
१) सिटी एफसी पुणेः ६ (सात्विक नायक ३१, ३३, ३७ मि., रायथम मालविया ४६ मि., ललित पाटील ४८ मि., अर्थव रेवाळकर ५८ मि.) वि.वि. एफसी शिवनेरीः ०;
२) दुर्गा एफसीः ३ (मयुर वाघिरे १५, २०, ५६ मि.) वि.वि. लिजंड्स युनायटेडः ०;
३) साई एफएः १ (हर्ष परीहार ४ मि.) बरोबरी वि. खडकी ब्ल्युज्ः १ (अर्थव कौसाळकर ५० मि.);

फोटो ओळीः दुर्गा एफसी (काळा जर्सी) आणि लिजंड्स युनायटेड (पिवळा जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!