Mohit Gupta
‘टीआरपीएस कॉर्पोरेट करंडक’ टी-२० क्रिकेट २०२४ स्पर्धा
बॉश इलेव्हन, वॉरीयर्स इलेव्हन, युबीएस कंपनी संघांची विजयी आगेकूच !!
हिंजेवाडी येथील फोरस्टार मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये दुंडी नागोठी याने केलेल्या नाबाद ५६ धावांच्या जोरावर बॉश इलेव्हनने टेक महिंद्रा संघाचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या टेक महिंद्रा संघाने १३९ धावांचे आव्हान उभे केले होते. बॉश इलेव्हनने हे लक्ष्य १६ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. दुंडी नागोठी (नाबाद ५६ धावा) आणि संकेत देशमुख (२९ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.
प्रसाद गिरकर याने केलेल्या अचूक कामगिरीच्या जोरावर वॉरीयर्स इलेव्हनने सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीचा ४२ धावांनी सहज पराभव केला. दुसर्या सामन्यामध्ये मोहीत गुप्ता याने केलेल्या ४४ धावांच्या स्फोटक फलंदाजीमुळे युबीएस कंपनीने तोरो क्लबचा ७ गडी राखून पराभव केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
टेक महिंद्राः १८ षटकात ८ गडी बाद १३९ धावा (संकेत माने ४१, सचिन पिंपरीकर २२, प्रकाश वेदगमा नाबाद २३, शिवेंद्र सिंग २-१३, तुशार वैंगणकर २-१३) पराभूत वि. बॉश इलेव्हनः १६ षटकात ३ गडी बाद २६३ धावा (दुंडी नागोठी नाबाद ५६ (४४, १ चौकार, ४ षटकार), संकेत देशमुख २९, अझहर शेख १-१७, सचिन पिंपरीकर १-१९); सामनावीरः दुंडी नागोठी;
वॉरीयर्स इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १२१ धावा (सागर गाडे २१, देब्रता नायक २०, अभिनव दुबे १४, हिमांशु जांग्रा १४, सौरभ सिंग ३-३०, रोहीत भोले २-२०) वि.वि. सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीः २० षटकात ८ गडी बाद ७९ धावा (मयांक पांडे २४, प्रसाद गिरकर २-१२, देवतोष एस.२-१०); सामनावीरः प्रसाद गिरकर;
तोरो क्लबः २० षटकात ७ गडी बाद १३२ धावा (जयंत जांगीतवार ४१, दर्शन बोथारा १८, मोहीत गुप्ता २-२३) पराभूत वि. युबीएस कंपनीः १३ षटकात ३ गडी बाद १३३ धावा (मोहीत गुप्ता ४४ (१५, ७ चौकार, २ षटकार), आदित्य गजभिये ३६, हरप्रीत सिंग नाबाद २३, श्रेयस नगरकर २-२६); सामनावीरः मोहीत गुप्ता.
Doondi Nagothi