• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Turban Titans Team

‘एमएआर लीग’ अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धा !!

अनप्रिडीक्टेबल इलेव्हन संघाला विजेतेपद !!

पुणे, २९ डिसेंबरः ‘एमएआर लीग’ अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये निशांत बाबर याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर अनप्रिडीक्टेबल इलेव्हनने ग्रीनपार्क क्लबचा २ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

लोहगांव येथील रन-३६० टर्फ मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना अनप्रिडीक्टेबल इलेव्हनने ९३ धावांचे आव्हान उभे केले होते. निशांत बाबर याने सर्वाधिक नाबाद ३७ धावांची खेळी केली. त्याला रवि सिंग (१७ धावा) आणि गौरव पलहेरकर (१४ धावा) यांनी दुसर्‍या बाजुने योग्य साथ दिली. प्रथम खांडवे याने अचूक गोलंदाजी करताना ८ धावांमध्ये ३ गडी टिपले. या लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रीनपार्क क्लबने ९१ धावांची मजल मारली. राज राठोड याने ४३ धावांची तर, अभि केदारी याने नाबाद २३ धावांची खेळी केली. पण तरीही अंतिम विजेतेपद ग्रीनपार्क संघापासून केवळ दोन धावांनी दुर राहीले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक अजय नायर, सुमित बिजलानी, अवरजीत नहा आणि ओम पाटील यांच्या हस्ते करण् यात आले. विजेत्या अनप्रिडीक्टेबल संघ आणि उपविजेत्या ग्रीनपार्क संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
अनप्रिडीक्टेबल इलेव्हनः ८ षटकात ६ गडी बाद ९३ धावा (निशांत बाबर नाबाद ३७, रवि सिंग १७, गौरव पलहेरकर १४, प्रथम खांडवे ३-८) वि.वि. ग्रीनपार्क क्लबः ८ षटकात ४ गडी बाद ९१ धावा (राज राठोड ४३, अभि केदारी नाबाद २३, कृष्णा राजपुत १-२४); सामनावीरः निशांत बाबर;

फोटो ओळीः स्पर्धेतील विजेता अनप्रिडीक्टेबल इलेव्हन संघ करंडकासह.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!