• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

फोटो ओळी: स्पर्धेतील विजेता पृथ्वी क्रिकेट अकॅडमी संघ प्रमुख पाहुण्यांसह.

कमोडोर एल.एस. मेहता स्मरणार्थ ‘गुरू विजय दळवी करंडक’ १४ वर्षाखालील मुलांली क्रिकेट स्पर्धा

पृथ्वी क्रिकेट अ‍ॅकॅडमीला विजेतेपद !!

पुणे, २६ डिसेंबरः कमोडोर एल.एस. मेहता यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘गुरू विजय दळवी करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ षटकांच्या क्रिकेट २०२४ स्पर्धेत स्वराज मोरे याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे पृथ्वी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ३६ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

धानोरी येथील डी.एन.परांडे स्पोर्ट्स हब मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा खेळताना पृथ्वी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २५ षटकामध्ये १७८ धावांचे लक्ष्य उभे केले. शौर्य कोंडे याने ४१ धावांची तर, पृथ्वीराज खांडवे याने ३१ धावांची खेळी केली. या दोघा सलामीवीरांनी ७४ चेंडूत ६७ धावांची सलामी देताना संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर मधल्याफळीतील फलंदाज सर्वेश आर. याने ३९ धावा आणि स्वराज मोरे याने ३३ धावांचे योगदान देत संघाला १७८ धावांचे लक्ष्य उभे करून दिले.

या आव्हानाला उत्तर देताना वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव २५ षटकामध्ये १४२ धावांवर मर्यादित राहीला. वीरन पाटील याने ४५ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावांची खेळी केली. याशिवाय आर्यन ताकवणे याने ३१ धावांचे योगदान दिले. स्वराज मोरे याने १७ धावांमध्ये ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली आणि संघाच्या विजयामध्ये अष्टपैलु योगदान दिले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सर्वोच्च परिषदेचे सदस्य सुशील शेवाळे, माजी रणजीपटू प्रभाकर मोरे, पराग मोरे, चेतन थोरात, निशा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संचालक मोहसीन तांबोळी, समीर पटेल आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या पृथ्वी अ‍ॅकॅडमी आणि उपविजेत्या वैभव अ‍ॅकॅडमीला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पृथ्वी क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ४ गडी बाद १७८ धावा (शौर्य कोंडे ४१, सर्वेश आर. ३९, स्वराज मोरे ३३, पृथ्वीराज खांडवे ३१, तनिष्क दरेकर २-१८, ओम कुटळे २-२१) वि.वि. वैभव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १४२ धावा (वीरन पाटील ५४ (४५, ९ चौकार, १ षटकार), आर्यन ताकवणे ३१, स्वराज मोरे ३-१७, अमन माने २-२२); सामनावीरः स्वराज मोरे.

फोटो ओळी: स्पर्धेतील विजेता पृथ्वी क्रिकेट अकॅडमी संघ प्रमुख पाहुण्यांसह.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!