पाचवी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, कॉर्पोरेट विलोवर्स संघांची विजयी कामगिरी !!
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुमित ठाकूरवार याने फटकावलेल्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर कॉर्पोरेट विलोवर्स संघाने टायटन बुल्स् संघाचा ७ गडी राखून पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टायटन बुल्स्ने १९.१ षटकामध्ये १२६ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रथमेश देशपांडे याने ६० धावांची खेळी केली तर, सुनिल यादव याने २५ धावांची खेळी केली. हे लक्ष्य कॉर्पोरेट विलोवर्सने १२.१ षटकात पूर्ण केले. सुमित ठाकूरवार याने ४४ चेंडूत ९ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ८८ धावा करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
दर्शन नाईक याने केलेल्या नाबाद ७२ धावांच्या जोरावर कॅप क्रुसडर्स संघाने जीएसके क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना जीएसके क्रिकेट क्लबने १६४ धावा जमविल्या. केशव डी. याने ५१ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८१ धावांची खेळी केली. त्याला आनंद शिंदे याने ४६ धावा करून उत्तम साथ दिली. हे आव्हान कॅप क्रुसडर्स संघाने १६.५ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. दर्शन नाईक याने ३० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी केली. समोरून परेश कोठारी याने ५८ धावा करून उत्तम साथ दिली. दर्शन आणि परेश यांनी चौथ्या गड्यासाठी ४९ चेंडूत १०३ धावांची भागिदारी करून संघाचा विजय निश्चित केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
टायटन बुल्स्ः १९.१ षटकात १० गडी बाद १२६ धावा (प्रथमेश देशपांडे ६० (३८, ७ चौकार, १ षटकार), सुनिल यादव २५, अक्षय फिस्के ३-१५, नितीन चौहान ३-१७, सुमित ठाकूरवार २-१५) पराभूत वि. कॉर्पोरेट विलोवर्सः १२.१ षटकात ३ गडी बाद १३० धावा (सुमित ठाकूरवार नाबाद ८८ (४४, ९ चौकार, ७ षटकार), रोनक पटेल १७, चिन्मय कुर्वे १५, प्रदीप डोंगरे २-११); सामनावीरः सुमित ठाकूरवार;
जीएसके क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद १६४ धावा (केशव डी. नाबाद ८१ (५१, ८ चौकार, ५ षटकार), आनंद शिंदे ४६, गुलशन अहुजा २-३३) पराभूत वि. कॅप क्रुसडर्सः १६.५ षटकात ४ गडी बाद १६५ धावा (दर्शन नाईक नाबाद ७२ (३०, ९ चौकार, ४ षटकार), परेश कोठारी ५८ (४६, ४ चौकार, ३ षटकार), सचिन भावसार २-४२);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी दर्शन आणि परेश यांच्यात १०३ (४९); सामनावीरः दर्शन नाईक;