‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत ग्रुप सुर्या संघाला विजेतेपद !!
पुणे, २२ फेब्रुवारीः रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे आयोजित ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत प्रशांत भोईर याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर ग्रुप सुर्या संघाने एसजे कन्स्ट्रक्शन्स् संघाचा ६ गडी राखून पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
तळेगांव-दाभाडे येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा खेळताना एसजे कन्स्ट्रक्शन्स् संघाने ७८ धावांचे आव्हान उभे केले. रोहीत वाघमारे याने ४३ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. सुर्या संघाने राजेश पवार याने ६ धावांमध्ये ३ गडी बाद केले तर, प्रशांत भोईर याने १७ धावांमध्ये २ गडी टिपले. हे लक्ष्य ग्रुप सुर्या संघाने ७ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. प्रशांत भोईर याने १९ चेंडूत ३ चौकारांसह आणि ६ षटकारांसह ५३ धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला आणि विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस्चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे आणि स्पर्धा संचालिका शैला हिंगे, एसकॉन प्रॉजेक्टस्चे कार्यकारी संचालक निलेश चव्हाण, एसजे कन्स्ट्रक्शन्स्चे संचालक सुहास जुंगाळे आणि सौरभ जुंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या ग्रुप सुर्या संघाला १ लाख रूपये पारितोषिक आणि करंडक तर, उपविजेत्या एसजे कन्स्ट्रक्शन्स् संघाला ५१ हजार रूपये पारितोषिक आणि करंडक देण्यात आला. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज राजेश पवार याला ११ हजार रूपये, करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. सर्वोत्कृष्ट गोलंदाज विक्रम झाकडे याला करंडक व सन्माचिन्ह देण्यात आला.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
एसजे कन्स्ट्रक्शन्स्ः ८ षटकात ८ गडी बाद ७८ धावा (रोहीत वाघमारे ४३ (२२, २ चौकार, ३ षटकार), रोहीत वाणी नाबाद १४, राजेश पवार ३-६, प्रशांत भोईर २-१७) पराभूत वि. ग्रुप सुर्याः ७ षटकात ४ गडी बाद ८३ धावा (प्रशांत भोईर ५३ (१९, ३ चौकार, ६ षटकार), रोहीत वाघमारे २-९); सामनावीरः प्रशांत भोईर.
वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजः राजेश पवार (१९३ धावा, ९ विकेट, ग्रुप सुर्या);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः विक्रम झाकडे (९ विकेट, एसजे कन्स्ट्रक्शन्स्);
फोटो ओळीः स्पर्धेतील विजेतेपद मिळवणारा ग्रुप सुर्या संघ प्रमुख पाहुण्यांसोबत आणि करंडकासह.