‘पीडीएफए युथ लीग’ स्पर्धा

आर्यन्स् स्पोटर्स फाऊंडेशन, व्हिजन स्पोटर्स, अशोका फुटबॉल क्लब, यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

पुणे, ३ फेब्रुवारीः आर. एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या ७ वर्षाखालील गटात आर्यन्स् स्पोटर्स फाऊंडेशन, व्हिजन स्पोटर्स, अशोका फुटबॉल क्लब आणि यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

रहाटणी येथील स्पोर्टझी अरेना मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ७ वर्षाखालील गटाच्या सामन्यामध्ये आर्यन्स् स्पोटर्स फाऊंडेशन संघाने पुणे पायोनिअर्स एफसी संघाचा ५-१ असा सहज पराभव केला. आर्यन्स् संघाकडून पर्णवी ठाके, सोहम डोलस्तवर, शिवम गुंजाळ, निस्वर पंडीत आणि दर्श के. यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. पुणे पायोनिअर्स एफसीकडून युवान एस. याने एकमेव गोल नोंदविला. रूद्रांश जोशी आणि हर्ष देशपांडे यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर व्हिजन स्पोटर्स संघाने अ‍ॅड्रेलाईन स्पोटर्स क्लबचा २-० असा पराभव केला. कॉन्शस् स्पोटर्स क्लबने आपली विजयी घौडदौड कायम ठेवताना साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा ३-२ असा निसटता पराभव केला. कॉन्शस् संघाकडून कबिर एम., अन्शुमन कुमार आणि शिवांश देसाई यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीकडून कबिर हेडा आणि नक्क्ष कोथियाल यांनी गोल नोंदविले.

अशोका फुटबॉल क्लबने सिग्मय एफसी संघाचा ४-२ असा पराभव केला. अशोका संघाकडून अर्णव पटेल याने २ गोल तर, विहान अरोरा आणि व्योम एस. यांनी एकेक गोल केला. सिग्मय एफसीकडून रेयांश शहा याने दोन गोल केले. देशांश थोरात याने नोंदविलेल्या हॅट्ट्रीक गोलांच्या जोरावर यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमीने शॉ स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा ३-२ असा पराभव केला.

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः ७ वर्षाखालील गटः
१) आर्यन्स् स्पोटर्स फाऊंडेशनः ५ (पर्णवी ठाके, सोहम डोलस्तवर, शिवम गुंजाळ, निस्वर पंडीत, दर्श के.) वि.वि. पुणे पायोनिअर्स एफसीः १ (युवान एस.);
२) व्हिजन स्पोटर्सः २ (रूद्रांश जोशी, हर्ष देशपांडे) वि.वि. अ‍ॅड्रेलाईन स्पोटर्स क्लबः०;
३) कॉन्शस् स्पोटर्सः ३ (कबिर एम., अन्शुमन कुमार, शिवांश देसाई) वि.वि. साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीः २ (कबिर हेडा, नक्क्ष कोथियाल);
४) अशोका फुटबॉल क्लबः ४ (विहान अरोरा, अर्णव पटेल २ गोल, व्योम एस.) वि.वि. सिग्मय एफसीः २ (रेयांश शहा २ गोल);
५) यंग स्टेप्स् अ‍ॅकॅडमीः ३ (देवांश थोरात) वि.वि. शॉ स्पोटर्स अ‍ॅकॅडमीः २ (नील जोशी, अयांश के.);

फोटो ओळीः
फोटो १: अशोका फुटबॉल क्लब (निळा जर्सी) आणि सिग्मय फुटबॉल क्लब (नारंगी जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.
फोटो २: पुणे पायोनिअर्स एफसी (निळा जर्सी) आणि आर्यन्स् स्पोटर्स फाऊंडेशन (काळा+नारंगी जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!