रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’ स्पर्धेचे ९
फेब्रुवारी रोजी आयोजन !!
पुणे, दि. २९ जानेवारीः रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे चालणे, पळणे आणि सायकल चालवणे अशा तीन वेगवेगळ्या गोष्टींचा संगम असलेल्या ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. शिवाजीनगर येथील बीएमसीसी महाविद्यालय येथून या स्पर्धेला रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ४: वाजता प्रारंभ होणार आहे.
पत्रकार परिषदेमध्ये याबाबत अधिक माहिती देताना ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’चे अध्यक्ष जयदीप पारेख, रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष मेजर जनरल अमर क्रीष्णा, पबमॅटीक इंडिया प्रा.लि. चे सहसंस्थापक आणि अध्यक्ष मुकूल कुमार, आदित्य बिर्ला म्युच्यूअल फंडचे विभागीय मुख्य मनिष शुक्ला यांनी सांगितले की, मॅरेथॉन म्हणजेच पळणे, सायक्लोथॉन म्हणजेच सायकलवरून व्यायाम आणि वॉकेथॉन म्हणजेच चालणे, अशा तीन वेगवेगळ्या गोष्टींना एकत्रिपणे आणून ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाव्दारे समाजातील सर्व वयोगटातील लोकांना निरोगी जीवनशैली स्विकारण्यास तसेच स्वाथ्यपूर्ण अशा जीवनशैलीला प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने समाजातील वंचित घटकांच्या फायद्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून (सीएसआर) आणि प्रायोजकत्व, देणग्याव्दारे ग्रामीण क्षेत्रातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांसाठी वैद्यकिय आणि शैक्षणिक गोष्टींसाठी निधी संकलित करण्याचे उद्दीष्ट आहे.
ही स्पर्धा पबमॅटिक इंडिया प्रा.लि., आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड, वेंकीज (इंडिया) प्रा.लि., सी.टी.पंडोल अँड सन्स, रूबी हॉल क्लिनिक, कोटक म्युच्युअल फंड, कुमार कॉर्प आणि स्कार्टर्स अशा विविध क्षेत्रातील कंपन्या, हॉस्पिटल्स् आणि संस्था यांच्या पाठींब्यातून आयोजित केला गेला आहे.
श्री. जयदीप पारेख यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ पुणेच्या माध्यमातून आम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठी विविध वैद्यकीय सेवा देत असतो. ज्या सेवा किंवा उपचार याचा आर्थिक भार ग्रामीण भागातील नागरिकांना उचलणे शक्य नसते. काही वैद्यकीय उपचारांसाठी लागणारी औषधे ही ग्रामीण भागातील नागरिकाना परवडणारी नसतात किंवा त्याचा खर्च त्यांच्यासाठी अवाक्याबाहेरचा असतो. अशी मदत करताना आम्ही मुलांना जास्त प्राध्यान्य देत असतो. मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया हा मोठा खर्चिक उपचार असतो आणि त्यासाठी आर्थिक मदत देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसेच मुलांसाठी लागणारी विविध वैद्यकीय उपकरणे पुरवणे, किशोर मधुमेहींची काळजी, अंगभंग झालेल्यांना कृत्रिम अवयव प्रदान करणे, यासारखी कामे करतो असतो. तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी कामे करण्यात येतात. ग्रामीण शाळांमधील गरजेनुसार विविध शैक्षणिक साहीत्य पुरविण्यापासून विद्यार्थ्यांच्या मुलभूत गरजासुद्धा पूर्ण केल्या जातात. आर्थिक सहाय्यतेपासून ते विद्यार्थिनींसाठी शौचालय ब्लॉक तयार करणे यासारखी विविधांगी कामे पूर्ण करण्याचा आमचा उद्देश आहे.
सायक्लोथॉन, मॅरेथॉन आणि वॉकेथॉन या तीन उपक्रमांसह मस्ती-मजा आणि तंदुरूस्तीचे वेगवेगळे कार्यक्रमही या उपक्रमामध्ये होणार आहेत. नागरिकांमध्ये व्यायाम आणि निरोगी आरोग्याच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच समाजातील समाजिक-आर्थिकदृष्टया मागासलेल्या घटकातील जास्तीत जास्त मुलांना मदत करणे असे दुहेरी उद्देश ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’ व्दारे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एक उत्साही धावपटू म्हणून वंचितांचे उत्थान करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सोबत ‘द अल्टिमेट मूव्ह-ए-थॉन’ कार्यक्रमाला पाठिंबा देण्याचा मला अभिमान आहे. पबमॅटिकमध्ये आमचे सीएसआर प्रयत्न शिक्षण, आरोग्य आणि सामुदायिक कल्याणावर केंद्रित आहेत. आम्ही शाश्वत प्रगती साधण्यासाठी, पुढी, पिढीसाठी उज्ज्वल, न्याय्य भविष्यासाठी योगदान देण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे पबमॅटीक इंडियाचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष मुकूल कुमार यांनी सांगितले.
आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ए. बालासुब्रमण्यम यांनी सांगितले की, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडमध्ये आमचा असा विश्वास आहे की, खरी वाढ केवळ आर्थिक नव्हे तर ती आपल्या समाजामध्ये सकारात्मक परिणाम निर्माण करणे, हा आहे. रोटरी क्लब ऑफ पूनाचा उपक्रम एकता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीच्या मूल्यांना मूर्त स्वरूप देतो. या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्याला केवळ निरोगी, सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याशिवाय वंचितांच्या जीवनातही भरीव फरक घडवून आणण्याची संधी मिळत आहे. म्हणूनच आपल्या समुदायाच्या सामूहिक कल्याणासाठी आपण एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धेतील सायक्लोथॉन आणि मॅरेथॉन ही १० कि.मी. आणि २१ कि.मी. अशा दोन गटात तर, वॉकेथॉन ही ३ कि.मी. आणि ५ कि.मी. अशा दोन गटात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, प्रशस्तीपत्रक, मेडल्स् आणि फुड-पॅकेट देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी ८९५६३९४२०२ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.