‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत

 

प्रितेश निंबाळकर, समीर मंसुरी, शंकर सणस, बालकृष्ण अंजारे, आशिष चौहान, केतन गद्रे यांची आगेकूच !!

 

संदीप पवार, कृष्णा देवेंद्र, अजय कामत यांना आपापल्या गटाचे अग्रमानांकन !!
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

पुणे, दि. १८ जानेवारीः सोलारीस क्लब, ग्लोबल वरिष्ठ टेनिस संघटना (जीएसटीए) आणि रविंद्र पांड्ये टेनिस अ‍ॅकॅडमी (आरपीटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे आयोजित अकराव्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२५ स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये नांदेडच्या प्रितेश निंबाळकर, पुण्याच्या समीर मंसुरी, शंकर सणस, बालकृष्ण अंजारे, आशिष चौहान, केतन गद्रे आणि दलविंदर सिंग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेच्या एकेरी गटामध्ये मुंबईच्या संदीप पवार (३५ वर्षावरील गट) आणि कृष्णा देवेंद्र (४५ वर्षावरील गट) व पुण्याच्या अजय कामत (५५ वर्षावरील गट) यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.मयुर कॉलनी येथील सोलारीस लब येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या पहिल्या चरणामध्ये शंकर सणस याने राजिव लाडे याचा ७-३ असा सहज पराभव केला. बालकृष्ण अंजारे याने अजित सुदंतीकर याचा ७-० असा सहज पराभव केला. नांदेडच्या प्रितेश निंबाळकर याने रणदीन सिंग याचा ७-१ असा सहज पराभव केला. समीर मंसुरी याने कपिल भाटी याचा तर, आशिष चौहान याने मोहींदर मल्होत्रा याचा ७-३ अशा सारख्याच फरकाने पराभव केला. विशाल कांबळे याने कौस्तुभ पाटील याचा ७-५ असा सहज पराभव केला. केतन गद्रे याने अभिमन्यु करोटे याच्यावर ७-२ असा सहज पराभव केला.

अतुल कलामपुरकर याने स्वप्निल त्रिकणे याचा तर, प्रताप श्रृंगारे याने मुकेंद्र सिंग याचा ७-१ असा सहज पराभव केला. अभिषेक शर्मा याने केतन शिंदे याचा ७-१ असा सहज पराभव केला. रितेश रातुसरीया याने संजीव चव्हाणचा ७-१ असा पराभव केला. दलविंदर सिंग याने धनंजय जळगांवकर याचा ७-३ असा पराभव करून आगेकूच केली.

याआधी स्पर्धेचे उद्घाटन सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत एकूण चारशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकालः ३५ वर्षावरील गटः पहिली पात्रता फेरीः
शंकर सणस वि.वि. राजिव लाडे ७-३; बालकृष्ण अंजारे वि.वि. अजित सुदंतीकर ७-०;
हौजीफा हकीम वि.वि. सचिन सावी ७-१; विशाल कांबळे वि.वि. कौस्तुभ पाटील ७-५;
आशिष चौहान वि.वि. मोहींदर मल्होत्रा ७-३; केतन गद्रे वि.वि. अभिमन्यु करोटे ७-२;
प्रितेश निंबाळकर (नांदेड) वि.वि. रणदीन सिंग ७-१; समीर मंसुरी वि.वि. कपिल भाटी ७-३;
दलविंदर सिंग वि.वि. धनंजय जळगांवकर ७-३; गौरव दवी वि.वि. गोपाळ साहू ७-०;
अमेय श्रीखंडे वि.वि. सचिनकुमार झा ७-२; अतुल कलामपुरकर वि.वि. स्वप्निल त्रिकणे ७-१;
प्रताप श्रृंगारे वि.वि. मुकेंद्र सिंग ७-१; अभिषेक शर्मा वि.वि. केतन शिंदे ७-१;
रितेश रातुसरीया वि.वि. संजीव चव्हाण ७-१;

एकेरी गटः मानांकनः ३५ वर्षावरील गटः
१) संदीप पवार (मुंबई), २) नीरज आनंद (पुणे), ३) निखील भगत (पुणे), ४) मुरूगन (कर्नाटक), ५) चैतन्य सरळकर (पुणे), ६), सचिन इंदुलकर (कोल्हापुर), ७) रविंद्र पांड्ये (पुणे), ८) संतोष दळवी (पुणे);

४५ वर्षावरील गटः
१) कृष्णा देवेंद्र (मुंबई); २) नितीन किर्तने (पुणे); ३) विकास अरवानी (अमरावती), ४) मंदार वाकणकर (पुणे), ५) जॉय बॅनर्जी (पुणे); ६) यतीन परांजपे (पुणे), ७) अमरनाथ सुरेंद्रनाथ (उत्तरप्रदेश), ८) विकास बिचलू (पुणे);

५५ वर्षावरील गटः
१) अजय कामत (पुण), २) भूषण अकूत (मुंबई), ३) रमेश अय्यर (मुंबई), ४) आर.व्हि. रामाराजू (तेलंगणा), ५) अशोक रंगळे (कोल्हापुर), ६) धरमवीर सिंग (पुणे), ७) संजय कळगांवकर (पुणे), ८) एकनाथ घोडेकर;

फोटो ओळीः स्पर्धेचे उद्घाटन करताना स्पर्धेतील खेळाडू करताना.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!