पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन होण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार मुरलीधर मोहोळ !!

 

पुनीत बालन यांच्यातर्फे सर्व विजेत्यांना दहा लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर !!

पुणे, 19 जानेवारीः महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये पुनश्च एकवार नॅशनल गेम्सचे आयोजन व्हायला हवे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूया असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.

बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्यूदो हा खेळ माझ्या आवडत्या कुस्ती खेळाशी खूप साम्य असून यातील डावही कुस्तीमध्ये वापरले जातात त्यामुळे ज्यूदो आणि कुस्ती हे युद्धकलेचे खेळ, भाऊ-भाऊच आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. यावेळी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील सहभागी पदक विजेत्यांसाठी रोख दहा लाख रुपयांची बक्षिसांची घोषणा केली, यामध्ये सुवर्णपदक विजेत्यास 11,000 रुपये, रोप्य पदक विजेत्यास 7000 रुपये तर दोन्ही कांस्यपदक विजेत्यास पाच हजार प्रत्येकी असे बक्षीस जाहीर केले.

यावेळी व्यासपीठावर इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सचे तथागत मुखर्जी आणि ज्यूदो फेडरेशनचे पदाधिकारी वीरेंद्र वशिष्ठ, सी एस राजन यांसह द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त जीवन शर्मा, अर्जुन पुरस्कार प्राप्त यशपाल सोलंकी, राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

समारंभास पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारे यांना विशेष आमंत्रित केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.

स्पर्धेसाठी सबज्युनियर गटामध्ये 29 राज्यातील 235 मुले आणि 230 मुली खेळाडू सहभागी झाले आहेत.

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!