‘पीडीएफए युथ लीग’ स्पर्धा

आर्यन्स् स्पोटर्स, व्हिजन स्पोटर्स, नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमी, फोर लायन्स् संघांची विजयी कामगिरी !!

पुणे, १६ जानेवारीः आर. एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या ७ वर्षाखालील गटात आर्यन्स् स्पोटर्स क्लब, द व्हिजन स्पोटर्स, नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमी आणि फोर लायन्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ७ वर्षाखालील गटाच्या सामन्यामध्ये अशोका फुटबॉल क्लब आणि फोर लायन्स्-रावेत यांच्या संघातील सामना ३-३ अशा बरोबरीत सुटला. अशोका फुटबॉल क्लबकडून व्ह्योम कुदळे याने २ गोल आणि अर्णव उबाळे याने एक गोल केला. फोर लायन्स् संघाकडून अन्ज्योत तोमर याने २ गोल तर, अनघ सकल्ले याने एक गोल केला. सोहम बोलस्तवर याने केेलेल्या चार गोलांच्या जोरावर आर्यन्स् स्पोटर्स क्लबने अ‍ॅड्रेलाईन स्पोटर्स ब संघाचा ६-० असा सहज पराभव केला. सामन्यामध्ये निस्वार्थ पंडीत याने दोन गोल केले.

रूद्रांश जाधव आणि आरव सुर्यवंशी यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर द व्हिजन स्पोटर्स संघाने पुणे पायोनियर एफसी संघाचा ४-० असा पराभव केला. नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमीने मेट्रोसिटी फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा ८-२ असा सहज पराभव केला. नाझ संघाकडून कबीर भोईनल्लु आणि हमझा मल्लु यांनी प्रत्येकी तीन गोल केले. याशिवाय विवांश कुलकर्णी आणि दक्क्ष सोनावणे यांनी प्रत्येकी एक गोल केला. मेट्रोसिटी फुटबॉल अ‍ॅकॅडमीकडून हार्दीक चौधरी आणि किआन पांड्ये यांनी प्रत्येकी एक गोल केला. पिंपळे-सौदागर येथील फोर लायन्स् संघाने इनोव्हेटीव्ह पुणे एफसीचा ४-० असा सहज पराभव केला. विहान चौधरी आणि अंज्योत तोमर यांनी प्रत्येकी दोन गोल करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः ७ वर्षाखालील गटः
१) आर्यन्स् स्पोटर्स क्लबः ६ (सोहम बोलस्तवर ४ गोल, निस्वार्थ पंडीत २ गोल) वि.वि. अ‍ॅड्रेलाईन स्पोटर्स बः ०; सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः सोहम बोलस्तवर;
२) अशोका फुटबॉल क्लबः ३ (व्ह्योम कुदळे २ गोल, अर्णव उबाळे १ गोल) बरोबरी वि. फोर लायन्स्, रावेतः ३ (अन्ज्योत तोमर २ गोल, अनघ सकल्ले १ गोल); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः अर्णव उबाळे;
३) द व्हिजन स्पोटर्सः ४ (रूद्रांश जाधव २ गोल, आरव सुर्यवंशी २ गोल) वि.वि. पुणे पायोनियर एफसीः ०; सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः रूद्रांश जाधव;
४) नाझ फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ८ (कबीर भोईनल्लु ३ गोल, हमझा मल्लु ३ गोल, विवांश कुलकर्णी, दक्क्ष सोनावणे) वि.वि. मेट्रोसिटी फुटबॉल अ‍ॅकॅडमीः २ (हार्दीक चौधरी, किआन पांड्ये); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः कबीर भोईनल्लु;
५) फोर लायन्स्, पिंपळे सौदागरः ४ (विहान चौधरी २ गोल, अंज्योत तोमर २ गोल) वि.वि. इनोव्हेटीव्ह पुणे एफसीः ०; सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः विहान चौधरी;

फोटो ओळीः फोर लायन्स् (नारंगी जर्सी) आणि इनोव्हेटीव्ह पुणे एफसी (लाल+नारंगी जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!