सिटी एफसी पुणे संघाचे दिड डझन गोल !!
फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी, यंग ब्ल्युज् एलिट पुणे, स्टॅलियन्स् पुणे एफसी संघांची विजयी कामगिरी !!
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

पुणे, ६ जानेवारीः आर. एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेत सिटी एफसी पुणे संघाने दिड डझन गोल मारून वर्चस्व गाजवले. फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी, यंग ब्ल्युज् एलिट पुणे आणि स्टॅलियन्स् पुणे एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

कात्रज येथील भारती विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिटी एफसी पुणे संघाने जुन्नर तालुका एफसी संघाच्या सामन्यात १८ गोल मारून वर्चस्व गाजवले. यामध्ये महेश राठोड याने १० गोल नोंदविले. याशिवाय प्रियांशु के. याने ४ गोल, पार्थ घोडके याने २ गोल तर, तन्मय एम. आणि सोहम जाधव यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. दुसर्‍या सामन्यामध्ये फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमीने स्टॅलियन्स् पुणे एफसी (अ) चा ७-१ असा सहज पराभव केला. फोर लायन्स्कडून आरूष ठाकरे, रूग्वेद मुसळे आणि आर्यमन अरविंद यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तन्मय एस. याने एक गोल नोंदविला. स्टॅलियन्स् पुणे एफसीकडून आरव भारव्दाज याने एक गोल केला.

यंग ब्ल्युज् एलिट पुणे संघाने साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा ५-२ असा पराभव केला. यंग ब्ल्युज् एलिट पुणे संघाकडून रणवीर पाटील आणि दर्शिल यादव यांनी प्रत्येकी दोन गोल केले. आर्यवर्धन काकडे याने एक गोल नोंदविला. साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीकडून वीर मांगुडकर व हर्ष अवरत्नमणी यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. स्टॅलियन्स् पुणे एफसी ब संघाने स्पोर्टीव्ह फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा ६-१ असा पराभव केला. स्टॅलियन्स् पुणे एफसीकडून नीरज कारळे आणि आयुष जुन्नरकर यांनी २ गोल केले. साहील जैस्वाल आणि अजिंक्य श्रीपाद यांनी यांनी प्रत्येकी एकेक गोल करून संघाची आघाडी वाढवली.

स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः १५ वर्षाखालील गटः
फोर लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ७ (आरूष ठाकरे २ गोल, रूग्वेद मुसळे २ गोल, आर्यमन अरविंद २ गोल, तन्मय एस. १ गोल) वि.वि. स्टॅलियन्स् पुणे एफसी अः १ (आरव भारव्दाज); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः आरूष ठाकरे;
सिटी एफसी पुणेः १८ (महेश राठोड १० गोल, प्रियांशु के. ४ गोल, पार्थ घोडके २ गोल, तन्मय एम. १, सोहम जाधव १ गोल) वि.वि. जुन्नर तालुका एफसीः ०; सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः महेश राठोड;
यंग ब्ल्युज् एलिट पुणेः ५ (आर्यवर्धन काकडे १ गोल, रणवीर पाटील २ गोल, दर्शिल यादव २ गोल) वि.वि. साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीः २ (वीर मांगुडकर १ गोल, हर्ष अवरत्नमणी १ गोल); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः आर्यवर्धन काकडे;
स्टॅलियन्स् पुणे एफसी बः ६ (नीरज कारळे २ गोल, आयुष जुन्नरकर २ गोल, साहील जैस्वाल, अजिंक्य श्रीपाद) वि.वि. स्पोर्टीव्ह फुटबॉल अ‍ॅकॅडमीः १ (मीत जाधव); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः साहील जैस्वाल;

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!