‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धा !!
स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब, योगेश क्रिकेट अॅकॅडमी संघांचा डबल विजय !!
Arnav Ghate
पुणे, ५ जानेवारीः ट्वेन्टीफोर स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धेत स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब आणि योगेश क्रिकेट अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अमर कामत याने केलेल्या नाबाद ५३ धावांच्या जोरावर स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबने सिल्व्हर क्रिकेट अॅकॅडमीचा २२ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्या स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबने २१ षटकात १५३ धावांचे लक्ष्य उभे केले. अमर कामत (नाबाद ५३ धावा) याच्यासह अनुज खराडे याने २३ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना सिल्व्हर क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १३१ धावांवर मर्यादित राहीला. अर्णव जोशी याने ४५ धावांची खेळी करून प्रतिकार केला. प्रत्युश निवंगुणे, सोहम जाधव आणि अनुप जाधव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला सहज विजय मिळवून दिला.अर्णव घाटे याने केलेल्या फलंदाजीमुळे योगेश क्रिकेट अॅकॅडमीने २२ याडर्स अॅकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्या २२ याडर्स अॅकॅडमीचा डाव ९६ धावांवर गडगडला. कोविड पराशर याने ३६ धावांची खेळी केली. परंतु दुसर्या बाजुने कोणताही फलंदाज उभा राहू शकला नाही. हे लक्ष्य योगेश क्रिकेट अॅकॅडमीने १४.३ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. अर्णव घाटे याने नाबाद ४९ धावा, कर्णधार अव्दिका जाधव हिने १८ धावा आणि अंकिता जरूपळा हिने १४ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः २१ षटकात ६ गडी बाद १५३ धावा (अमर कामत नाबाद ५३ (२७, ६ चौकार, २ षटकार), अनुज खराडे २३, श्रीशा वाघ २-२७) वि.वि. सिल्व्हर क्रिकेट अॅकॅडमीः २१ षटकात ९ गडी बाद १३१ धावा (अर्णव जोशी ४५, प्रत्युश निवंगुणे २-२१, सोहम जाधव २-२४, अनुप जाधव २-३२); सामनावीरः अमर कामत;
२२ याडर्स अॅकॅडमीः २३ षटकात ७ गडी बाद ९६ धावा (कोविड पराशर ३६, प्रज्वल सणस १६, अर्थव ए. २-१२) पराभूत वि. योगेश क्रिकेट अॅकॅडमीः १४.३ षटकात २ गडी बाद ९७ धावा (अर्णव घाटे नाबाद ४९ (४५, ६ चौकार), अव्दिका जाधव १८, अंकिता जरूपळा १४, विकास डोग्रे १-२४); सामनावीरः अर्णव घाटे.