‘टीआरपीएस कॉर्पोरेट करंडक’ टी-२० क्रिकेट २०२४ स्पर्धा

युबीएस संघाचा सुपरओव्हरमध्ये विजय; ऑरस संघाची विजयी सलामी !!

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Sandeep Deol

पुणे, २ जानेवारीः टीआरपीएस मॅनेजमेंट, अतुल ट्युटोरीयल्स् आणि लायन्स् क्लब पुणे रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तर्फे पहिल्या ‘टीआरपीएस कॉर्पोरेट करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत युबीएस संघाने एस.एस.अँड सी. संघाचा सुपरओव्हरमध्ये रोमहर्षक पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. ऑरस संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

हिंजेवाडी येथील फोरस्टार मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये पहिल्यांदा खेळणार्‍या युबीएस संघाने १२७ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये संदीप देओल याने ६० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली आणि संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. याला उत्तर देताना एस.एस. अँड सी. संघाच्या राहुल कृष्णन याने ४१ धावा आणि अभिषेक राय याने ३९ धावा करून विजयाच्या समीप नेले होते. एसएसडी संघाला (७ गडी बाद १२१ धावा) अखेरच्या दोन षटकांमध्ये ७ धावांची आवश्यकता होती. युबीएस संघाच्या संदीप देओल याने १९ वे षटक टाकताना केवळ ४ धावा दिल्या आणि एक गडी बाद केला. निर्णायक षटक हरप्रीत सिंग याने टाकताना केवळ ३ धावा दिल्या आणि सामना टाय झाला. सुपरओव्हरमध्ये एस.एस. अँड सी. संघाने ६ धावा केल्या तर, युबीएस संघाने हे लक्ष्य ४ चेंडूत पूर्ण करून सामना खिशात घातला.

रोहन फाटे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ऑरस टेक संघाने हनीवेल संघाचा २९ धावांनी सहज पराभव केला. ऑरस संघाने १६८ धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना हनीवेल संघाचा डाव १३९ धावांवर मर्यादित राहीला. रोहन याने १८ धावांमध्ये ४ गडी टिपले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
युबीएस संघः २० षटकात ८ गडी बाद १२७ धावा (संदीप देओल ७२ (६०, ६ चौकार, ३ षटकार), सुनिल कुंभार नाबाद १७, रोहीत शिंदे ३-१२, अभिषेक राय २-२७) सुपरओव्हरमध्ये वि.वि. एस.एस. अँड सी. संघः २० षटकात १० गडी बाद १२७ धावा (राहुल कृष्णन ४१, अभिषेक राय ३९, प्रविण सिंग ३-९, बादल तांबोळी २-१४);
सुपरओव्हरः एस.एस. अँड सी. संघः १ षटकात बिनबाद ६ धावा (रोहीत शिंदे नाबाद ४, प्रविण सिंग ०-५) पराभूत वि. युबीएस संघः ०.४ षटकात बिनबाद ९ धावा (संदीप देओल नाबाद ८, अभिषेक राय ०-९); सामनावीरः संदीप देओल;

ऑरस टेकः २० षटकात ८ गडी बाद १६८ धावा (रोशन किटुकाळे ३०, शुभम महाजन ३१, रोहीत पाटील २६, गौरव तारस २६, हितेश शृंगारपुरे २-११) वि.वि. हनीवेलः १९.२ षटकात १० गडी बाद १३९ धावा (तुषार कोल्हे २६, देवेन मेढी २२, कुलदीप ओरपे २२, रोहन फाटे ४-१८, विशाल चव्हाण १-९); सामनावीरः रोहन फाटे.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!