Smyan N
‘पीडीएफए युथ लीग’ स्पर्धा
स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी, सिंग्मय एफसी, रायझिंग पुणे एफसी, पुणे पायोनिअर एफसी, सिटी एफसी पुणे संघांची विजयी कामगिरी !!
पुणे, ३० डिसेंबरः आर. एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेत स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमी, सिंग्मय एफसी, रायझिंग पुणे एफसी, पुणे पायोनिअर एफसी आणि सिटी एफसी पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
रहाटणी येथील स्पोर्टझी अरेना मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीने पुणे पायोनिअर्स संघाचा १०-१ असा सहज पराभव केला. या सामन्यामध्ये उस्मान एफ. याने सर्वाधिक चार गोल तर, विवान साथवणे, जोनाथन सालोमन यांनी प्रत्येकी २ गोल केले. निकीत गुप्ता आणि सिद्धार्थ जगदाळे यांनी एकेक गोल मारले. सिग्मय एफसी संघाने मॅथ्यु फुटबॉल क्लबचा ५-४ असा विजयी मिळवून सलग दुसरा विजय नोंदविला. सिग्मय संघाकडून इशान जाधव आणि श्रेयश एस. यांनी प्रत्येकी दोन गोल केले. मॅथ्यु फुटबॉल क्लबकडून वेदांत कांबळे याने २ गोल केले तर, शौर्य सिंग आणि यशोवर्धम शिंदे याने प्रत्येकी एक गोल केला.
शिवम पी. याने केलेल्या कामगिरीमुळे रायझिंग पुणे एफसीने स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीचा १-० असा पराभव केला. प्रथमेश वन्नम याने केलेल्या तीन गोलांच्या जोरावर पुणे पायोनिअर एफसीने स्टॅलियन्स् पुणे एफसीचा ४-२ असा सहज पराभव केला. सिटी एफसी पुणे संघाने गेम ऑफ गोल संघाचा ४-२ असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः १३ वर्षाखालील गटः
स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीः १० (विवान साथवणे २ गोल, जोनाथन सालोमन २ गोल, उस्मान एफ. ४ गोल, निकीत गुप्ता १ गोल, सिद्धार्थ जगदाळे १ गोल) वि.वि. पुणे पायोनिअर्सः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः उस्मान एफ.;
सिग्मय एफसीः ५ (इशान जाधव २ गोल, श्रेयश एस. २ गोल, अर्थव भुजबळ) वि.वि. मॅथ्यु फुटबॉल क्लबः ४ (वेदांत कांबळे २ गोल, शौर्य सिंग, यशोवर्धम शिंदे); सर्वोत्कृष्ट खेळाडूः लुखोचिनचोन एम.(सिग्मय एफसी);
रायझिंग पुणे एफसीः १ (शिवम पी.) वि.वि. स्टेपओव्हर फुटबॉल अॅकॅडमीः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः सम्यन एन.
पुणे पायोनिअर एफसीः ४ (प्रथमेश वन्नम ३ गोल, स्वयंगोल) वि.वि. स्टॅलियन्स् पुणे एफसीः २ (अर्णव के. २ गोल); सर्वोत्कृष्ट खेळाडूः प्रथमेश वन्नम;
सिटी एफसी पुणेः ४ (मल्हार जी., आदिनाथ ए., अवनीश जे., वेद ए.) वि.वि. गेम ऑफ गोलः २ (वरद टी. गौरव आर.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः आदिनाथ ए..