‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टे्न्टी-२० क्रिकेट स्पर्धा
वेडगे अॅकॅडमी, रायझिंग क्रिकेट क्लब संघांची विजयी सलामी !!
पुणे, २९ डिसेंबरः पुणे क्रिकेट अॅकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने कै. अभिषेक ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टे्न्टी-२० क्रिकेट २०२४-२५ स्पर्धेत वेडगे अॅकॅडमी आणि रायझिंग क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सिद्धांत जोशी याने केलेल्या नाबाद ६८ धावांच्या जोरावर वेडगे अॅकॅडमीने २२ याडर्स अॅकॅडमीचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या २२ याडर्स अॅकॅडमीने १३३ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये यश माने याने नाबाद ४७ धावांची तर, अमित पवार याने ३२ धावांची खेळी केली. वेडगे अॅकॅडमीने हे लक्ष्य १४.५ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. सिद्धांत जोशी याने नाबाद ६८ धावांची तर, पंकज लालगुडे याने नाबाद ४६ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ६२ चेंडूत १०७ धावांची नाबाद भागिदारी करून संघाचा विजय साकार केला.
सुदीप धरणगांवकर याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर रायझिंग क्रिकेट क्लबने स्केलअप अॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव केल. पहिल्यांदा खेळणार्या स्केलअप अॅकॅडमीचा डाव ९३ धावांवर आटोपला. तोमेर कहामकेर याने ३७ धावांची खेळी केली. कपिल जांगिड याने ३ गडी तर, कृष्णा के. याने २ गडी बाद केले. हे लक्ष्य रायझिंग क्रिकेट क्लबने ७.४ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. सुदीप धरणगांवकर (नाबाद २८ धावा), जयेश पोळ (२७ धावा) आणि शिवराज माने (नाबाद २२ धावा) यांनी धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
२२ याडर्स अॅकॅडमीः १९ षटकात ८ गडी बाद १३३ धावा (यश माने नाबाद ४७, अमित पवार ३२, कपिल गायकवाड २-१५, निखील रोकडे २-२७) पराभूत वि. वेडगे अॅकॅडमीः १४.५ षटकात ३ गडी बाद १३४ धावा (सिद्धांत जोशी नाबाद ६८ (४७, ७ चौकार), पंकज लालगुडे नाबाद ४६, प्रसाद गुरव ३-१५);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी सिद्धांत आणि पंकज १०७ (६२); सामनावीरः सिद्धांत जोशी;
स्केलअप अॅकॅडमीः १६.२ षटकात १० गडी बाद ९३ धावा (तोमेर कहामकेर ३७, हिमांशु भोराडे २०, कपिल जांगिड ३-१३, कृष्णा के. २-१४) पराभूत वि. रायझिंग क्रिकेट क्लबः ७.४ षटकात २ गडी बाद ९६ धावा (सुदीप धरणगांवकर नाबाद २८, जयेश पोळ २७, शिवराज माने नाबाद २२); सामनावीरः सुदीप धरणगांवकर.