‘पीडीएफए युथ लीग’ स्पर्धा
स्पोर्टीक्यु फुटबॉल अॅकॅडमी, अशोका फुटबॉल क्लब, सिंग्मय एफसी, यंग स्टेप्स् अॅकॅडमी संघांची शानदार सुरूवात !!
पुणे, २७ डिसेंबरः आर. एम. स्पोटर्स कन्सेप्ट्स आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीडीएफए युथ लीग’ फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टीक्यु फुटबॉल अॅकॅडमी, अशोका फुटबॉल क्लब, सिंग्मय एफसी आणि यंग स्टेप्स् अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून शानदार सुरूवात केली.
रहाटणी येथील स्पोर्टझी अरेना मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पोर्टीक्यु फुटबॉल अॅकॅडमीने रायन सॉकर अॅकॅडमीचा डझनभर गोलने सहज पराभव केला. स्पोर्टीक्यु फुटबॉल अॅकॅडमीकडून समर्थ कुंभार याने सर्वाधिक ४ गोल केले. शोर्य मोहोळ, स्वराज शिंदे आणि सोहम दळवी यांनी प्रत्येकी दोन गोल केले. वेदस्वा कावडे आणि स्वराज काकडे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. दुसर्या सामन्यामध्ये अशोका फुटबॉल क्लबने आर्यन सॉकर अॅकॅडमीचा १४-१ असा धुव्वा उडविला. अशोका संघाकडून राघव शेखावत याने ५ गोल तर, शौर्य नवाघाणे याने ४ गोल केले. अर्णव राव, अर्णव बच्चोरे आणि इशान जोशी यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
सिंग्मय एफसी संघाने यंग स्टेप्स् अॅकॅडमीचा ८-३ असा एकतर्फी पराभव करून विजयी सलामी दिली. सिंग्मय संघाकडून काव्या ठक्कर, आरव चौहान आणि ऋषभ कमाने यांनी प्रत्येकी दोन गोल केले. याशिवाय पार्थ मुरदरे आणि सोहम डेंगदर यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. मैती शंख याने इनोव्हेटीव्ह पुणे एफसीकडून एकमेव गोल केला. यंग स्टेप्स् अॅकॅडमीने मॅथ्यु फुटबॉल अॅकॅडमीवर ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. यंग स्टेप्स् अॅकॅडमीकडून (सरनोविन एन. याने एक तर, सिद्धांत जे. याने २ गोल केले. मॅथ्यु संघाकडून शौर्य रणदिवे आणि सरनाथ मांगे यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः १३ वर्षाखालील गटः
स्पोर्टीक्यु फुटबॉल अॅकॅडमीः १२ (समर्थ कुंभार ४ गोल, शोर्य मोहोळ २ गोल, स्वराज शिंदे २ गोल, सोहम दळवी २ गोल, वेदस्वा कावडे १ गोल, स्वराज काकडे १ गोल) वि.वि. रायन सॉकर अॅकॅडमीः ०; सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः शौर्य मोहोळ;
अशोका फुटबॉल क्लबः १४ (राघव शेखावत ५ गोल, शौर्य नवाघाणे ४ गोल, अर्णव राव २ गोल, अर्णव बच्चोरे २ गोल, इशान जोशी २ गोल) वि.वि. आर्यन सॉकर अॅकॅडमीः १ (यश असावळे १ गोल); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः राघव शेखावत;
सिंग्मय एफसीः ८ (काव्या ठक्कर २ गोल, आरव चौहान २ गोल, ऋषभ कमाने २ गोल, पार्थ मुरदरे, सोहम डेंगदर) वि.वि. इनोव्हेटीव्ह पुणे एफसीः १ (मैती शंख); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः काव्या ठ्ठक्कर;
यंग स्टेप्स् अॅकॅडमीः ३ (सरनोविन एन., सिद्धांत जे. २ गोल) वि.वि. मॅथ्यु एफएः २ (शौर्य रणदिवे, सरनाथ मांगे); सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः पृथ्वी आर. (यंग स्टेप्स् अॅकॅडमी);
फोटो ओळीः स्पोर्टीक्यु फुटबॉल अॅकॅडमी (पिवळा जर्सी) आणि रायन सॉकर अॅकॅडमी (निळा जर्सी) यांच्या सामन्यातील क्षण.