Atharv Bodkhe
कमोडोर एल.एस. मेहता स्मरणार्थ ‘गुरू विजय दळवी करंडक’ १४ वर्षाखालील मुलांली क्रिकेट स्पर्धा
पृथ्वी क्रिकेट अॅकॅडमी, वैभव क्रिकेट अॅकॅडमी यांच्यात विजेतेपदासाठी लढत !!
पुणे, २५ डिसेंबरः कमोडोर एल.एस. मेहता यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘गुरू विजय दळवी करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ षटकांच्या क्रिकेट २०२४ स्पर्धेत पृथ्वी क्रिकेट अॅकॅडमी आणि वैभव क्रिकेट अॅकॅडमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
धानोरी येथील डी.एन.परांडे स्पोर्ट्स हब मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत अथर्व बोडके याने केलेल्या शतकी खेळीमुळे पृथ्वी अॅकॅडमीने २२ यार्ड्स् अॅकॅडमीचा ८८ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या पृथ्वी क्रिकेट अॅकॅडमीने २५ षटकात १९८ धावा चोपल्या. अथर्व बोडके याने ८१ चेंडूत १८ चौकार आणि १ षटकारांसह नाबाद ११५ धावांची खेळी केली. त्याने युवराज मोरे (३५ धावा) याच्यासाथीत ८४ चेंडूत ९९ धावांची सलामी दिली. त्यानंतर पृथ्वीराज खांडवे (नाबाद ३४ धावा) याच्यासह ९९ धावांची अभेद्य भागिदारी रचली. याला उत्तर देताना २२ यार्ड्स् अॅकॅडमीचा डाव ११० धावांवर मर्यादित राहीला.
आर्यन ताकवणे याने केलेल्या ६३ धावांच्या जोरावर वैभव क्रिकेट अॅकॅडमीने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचे आव्हान ३२ धावांनी मोडून काढले आणि अंतिम फेरी गाठली. आर्यन याने केलेेल्या धावांमुळे पहिल्यांदा खेळताना वैभव संघाने १७५ धावा धावफलकावर लावल्या. याचा पाठलाग करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १४३ धावांवर मर्यादित राहीला. सईश बारटक्के याने ६४ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पृथ्वी क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात १ गडी बाद १९८ धावा (अथर्व बोडके नाबाद ११५ (८१, १८ चौकार, १ षटकार), युवराज मोरे ३५, पृथ्वीराज खांडवे नाबाद ३४);(भागिदारीः पहिल्या गड्यसाठी अथर्व आणि युवराज यांच्यात ९९ (८४) वि.वि. २२ यार्ड्स् अॅकॅडमीः २४.४ षटकात १० गडी बाद ११० धावा (श्लोक पवार ४१, अव्देथ कृष्णा २-८, स्वराज मोरे २-१२, युवराज मोरे २-४); सामनावीरः अथर्व बोडके;
वैभव क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ५ गडी बाद १७५ धावा (आर्यन ताकवणे ६३ (५२, १३ चौकार), तनिष्क दरेकर ५४ (२७, १० चौकार, १ षटकार), अर्णव कडु २५, दर्श चानपुर ३-२०, सईश बारटक्के २-२१) वि.वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ७ गडी बाद १४३ धावा (सईश बारटक्के ६४ (५३, ७ चौकार, २ षटकार), स्वराज सातपुते ३८, आदिराज गोटे २-३१, तनिष्क दरेकर २-२७, आर्यन ताकवणे २-२८); सामनावीरः आर्यन ताकवणे.