‘टीआरपीएस कॉर्पोरेट करंडक’ टी-२० क्रिकेट २०२४ स्पर्धा
टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस संघांची विजयी आगेकूच !!
पुणे, २६ डिसेंबरः टीआरपीएस मॅनेजमेंट, अतुल ट्युटोरीयल्स् आणि लायन्स् क्लब पुणे रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तर्फे पहिल्या ‘टीआरपीएस कॉर्पोरेट करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि इन्फोसिस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी आगेकूच केली.
हिंजेवाडी येथील फोरस्टार मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये मिन्हाज अली याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेसने एस.एस. अँड सी. इलेव्हनचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या एस.एस. अँड सी. इलेव्हनचा डाव ४० धावांवर गडगडला. मिन्हाज अली याने १० धावांमध्ये ४ गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली. अली याला सागर दुबे आणि दिपक शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून योग्य साथ दिली. हे लक्ष्य टीसीएसने ६.१ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले.
संदीप संघई याने केलेल्या १२९ धावांच्या जोरावर इन्फोसिस संघाने बॉश इलेव्हनचा १५२ धावांनी सहज पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्या इन्फोसिसने २० षटकात २६३ धावांचा डोंगर उभा केला. संदीप संघई याने ६३ चेंडूत १६ चौकार आणि ६ षटकारांसह १२९ धावांची खेळी केली. हृषीकेश खांडेकर याने ५५ धावांची आणि सागर बिरदावडे याने ३८ धावांची खेळी केली. या आव्हानाला उत्तर देताना बॉश इलेव्हनचा डाव १११ धावांवर मर्यादित राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
इन्फोसिसः २० षटकात ३ गडी बाद २६३ धावा (संदीप संघई १२९ (६३, १६ चौकार, ६ षटकार), हृषीकेश खांडेकर ५५ (२६, ८ चौकार, २ षटकार), सागर बिरदावडे ३८, निकेत लाल १-३५);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी संदीप आणि हृषीकेश १२० (६१) वि.वि. बॉश इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १११ धावा (दोंडी नागोठी २७, प्रफुल्ल पाटील ३७, निखील रोकडे २-८, धीरज सिंग २-२८); सामनावीरः संदीप संघई;
एस.एस. अँड सी. इलेव्हनः ११ षटकात १० गडी बाद ४० धावा (अमरसिंह जाधव १२, मिन्हाज अली ४-१०, सागर दुबे २-३, दिपक शर्मा २-१४) पराभूत वि. टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ः ६.१ षटकात ३ गडी बाद ४६ धावा (रोहीत मायने नाबाद १४, प्रविण इंगळे नाबाद १७, रोहीत शिंदे २-७); सामनावीरः मिन्हाज अली.