‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टे्न्टी-२० क्रिकेट स्पर्धा
स्केलअप अॅकॅडमी, गेम चेंजर्स संघांची विजयी सलामी !!
पुणे, २५ डिसेंबरः पुणे क्रिकेट अॅकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने कै. अभिषेक ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टे्न्टी-२० क्रिकेट २०२४-२५ स्पर्धेत स्केलअप अॅकॅडमी आणि गेम चेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत वि जयी सलामी दिली.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत निव नागवेकर याने केलेल्या ६९ धावांच्या जोरावर स्केलअप अॅकॅडमीने ऑलस्टार अॅकॅडमीचा ५९ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्या स्केलअप अॅकॅडमीने निव नवगांवकर याच्या ६९ धावांच्यामुळे १६८ धावांचे लक्ष्य उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑलस्टार अॅकॅडमीचा डाव १०९ धावांवर आटोपला. स्केलअप संघाच्या यश बराटे याने १४ धावात ४ गडी बाद केले.
दुसर्या सामन्यामध्ये सौरभ दोडके याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे गेम चेंजर्सने मिझुकी क्लबचा २४ धावांनी पराभव करून शानदार सुरूवात केली. प्रथम खेळताना गेम चेंजर्सने १८ षटकात १६६ धावा धावफलकावर लावल्या. अभिनव तिवारी याने ५२ धावांची खेळी केली. याशिवाय आदिल अन्सारी (४१ धावा) आणि सौरभ दोडके (२८ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना मिझुकी क्लबचा डाव १४२ धावांवर मर्यादित राहीला. हिमांशु अगरवाल याने ५१ धावांची तर, राज एस. (३६ धावा) आणि इशान ओस्वाल (२३ धावा) यांनी धावा करून लढा दिला. सौरभ दोडके याने २२ धावात ३ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
स्केलअप अॅकॅडमीः १८ षटकात ७ गडी बाद १६८ धावा (निव नवगांवकर ६९ (३९, ७ चौकार, ४ षटकार), तोमेर कहामकर २७, योगेश पवार २३, सचिन विश्वकर्मा ४-३०) वि.वि. ऑलस्टार अॅकॅडमीः १७.४ षटकात १० गडी बाद १०९ धावा (जय जी. २७, योगेश डी. २३, यश बराटे ४-१४, याविर नागवेकर २-२३); सामनावीरः निव नागवेकर;
गेम चेंजर्सः १८ षटकात ७ गडी बाद १६६ धावा (अभिनव तिवारी ५२ (३६, ५ चौकार, २ षटकार), आदिल अन्सारी ४१, सौरभ दोडके २८, उत्कर्ष चौधरी २-२८, वैभव तेहाले २-३१) वि.वि. मिझुकी क्लबः १८ षटकात ५ गडी बाद १४२ धावा (हिमांशु अगरवाल ५१ (४२, ६ चौकार), राज एस. ३६, इशान ओस्वाल २३, सौरभ दोडके ३-२२); सामनावीरः सौरभ दोडके.