• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Jay Mohite

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Soham Yadav

‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धा !!

व्हिडीआर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, एके स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांचा डबल विजय !!

पुणे, २६ डिसेंबरः ट्वेन्टीफोर स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धेत व्हिडीआर क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि एके स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसर्‍या विजयांची नोंद केली.

सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जय मोहीते याने केलेल्या नाबाद ५२ धावांच्या जोरावर व्हिडीआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने क्षेत्रम अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना क्षेत्रम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ८२ धावांवर संपुष्टात आला. दक्क्ष दुसाने याने १७ धावा आणि दक्क्ष गित्ते याने ११ धावांचे योगदान दिले. हे लक्ष्य व्हिडीआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ११.४ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. जय मोहीते याने नाबाद ५२ धावा आणि सोहमराजे गोराडे याने १६ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

सोहम यादव याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर एके स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने मॅव्हरीक्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७९ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एके स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने १८७ धावांचे लक्ष्य उभे केले. सोहम यादव याने नाबाद ६४ धावांची खेळी केली. याशिवाय अमन माने (४२ धावा) आणि रूद्र पाटील (२८ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. याला उत्तर देताना मॅव्हरीक्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १०८ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
क्षेत्रम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २२.५ षटकात १० गडी बाद ८२ धावा (दक्क्ष दुसाने १७, दक्क्ष गित्ते ११, संस्कार बंडगर ३-१३) पराभूत वि. व्हिडीआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ११.४ षटकात २ गडी बाद ८४ धावा (जय मोहीते नाबाद ५२ (३४, ९ चौकार), सोहमराजे गोराडे १६, निलय जोशी १-१४); सामनावीरः जय मोहीते;

एके स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २३ षटकात ३ गडी बाद १८७ धावा (सोहम यादव नाबाद ६४ (६२, ७ चौकार), अमन माने ४२, रूद्र पाटील २८, युगांक भालेकर १-४१);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी अमन आणि सोहम यांच्यामध्ये ९६ (७२) वि.वि. मॅव्हरीक्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३ षटकात ४ गडी बाद १०८ धावा (अर्णव कट्टी १९, अर्णव पटेखेडे १३, अर्ष चव्हाण १-११); सामनावीरः सोहम यादव;

फोटो ओळीः क्षेत्रम क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि व्हिडीआर क्रिकेट अ‍ॅकॅडमी यांच्या सामन्यातील क्षण.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!