Yusuf Khan
कमोडोर एल.एस. मेहता स्मरणार्थ ‘गुरू विजय दळवी करंडक’ १४ वर्षाखालील मुलांली क्रिकेट स्पर्धा
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी संघाचे सलग दोन विजय !!
पुणे, २५ डिसेंबरः कमोडोर एल.एस. मेहता यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘गुरू विजय दळवी करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ षटकांच्या क्रिकेट २०२४ स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दोन विजयांची नोंद केली.
धानोरी येथील डी.एन.परांडे स्पोर्ट्स हब मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यामध्ये सईश बारटक्के याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीने घुले क्रिकेट अॅकॅडमीचा ६ धावांनी निसटता पराभव केला. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीने २५ षटकामध्ये १३६ धावांचे आव्हान उभे केले. सईश बारटक्के याने ५० धावांची खेळी केली. श्रेयान पारवे याने ३१ धावांचे योगदान दिले. याला उत्तर देताना घुले क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १३० धावांवर मर्यादित राहीला. अनवय कावणकर याने ५५ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला.
दुसर्या सामन्यामध्ये युसूफ खान याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीने पृथ्वीज् यंगस्टर अॅकॅडमीचा ९ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाज करणार्या पृथ्वीज् संघाचा डाव ६८ धावांवर गडगडला. युसूफ याने १५ धावांमध्ये ३ गडी टिपले. अव्दिक मगर (२-५) आणि श्रेयान पारवे (२-१२) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. हे लक्ष्य व्हेरॉक अॅकॅडमीने ९ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. अमेय घोडके याने नाबाद २६ धावा, अवनिश गायकवाड याने १४ धावा आणि राजवीर जुनावणे याने १५ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ६ गडी बाद १३६ धावा (सईश बारटक्के ५० (४४, ८ चौकार, १ षटकार), श्रेयान पारवे ३१, वरूण कुदळे १-१३, अर्थव बारटक्के १-१४) वि.वि. घुले क्रिकेट अॅकॅडमीः २४.४ षटकात १० गडी बाद १३० धावा (अनवय कावणकर ५५ (४४, ८ चौकार), रूद्राक्क्ष के. १५, श्रेयस राठोड ३-१४, सईश बारटक्के ३-२६); सामनावीरः सईश बारटक्के;
पृथ्वीज् यंगस्टर अॅकॅडमीः १९.१ षटकात १० गडी बाद ६८ धावा (वेदांत भोसले ११, युसूफ खान ३-१५, अव्दिक मगर २-५, श्रेयान पारवे २-१२) पराभूत वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीः ९ षटकात १ गडी बाद ७२ धावा (अमेय घोडके नाबाद २६, अवनिश गायकवाड १४, राजवीर जुनावणे १५); सामनावीरः युसूफ खान.