• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger
‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा

एसएम क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी आगेकूच !!
पुणे, २४ डिसेंबरः स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेत रेयान मोमीन याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे एसएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीने बीएस्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा ४५ धावांनी पराभव करून आगेकूच केली.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना एसएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ३४.४ षटकात १९२ धावांचे आव्हान उभे केले. विद्याधर कांबळे याने ७० धावांची खेळी केली. याशिवाय रेयान मोमीन (३१ धावा), सलमान शेख (२६ धावा) आणि ओंकार लोमटे (२७ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बीएस्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा डाव २७.३ षटकामध्ये १४७ धावांवर मर्यादित राहीला. बीए अ‍ॅकॅडमीकडून समर्थ धावरे (३४ धावा) आणि शिवम पाटील (३० धावा) यांनी छोट्या खेळी करून लढा दिला. रझ्झाक याने ३२ धावांत ३ गडी तर, रेयान मोमीन याने ५४ धावांमध्ये ३ गडी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३४.४ षटकात १० गडी बाद १९२ धावा (विद्याधर कांबळे ७० (७३, १२ चौकार), रेयान मोमीन ३१, सलमान शेख २६, ओंकार लोमटे २७, समर्थ धावरे ४-६०, वेदांत साळुंखे २-१५) वि.वि. बीएस्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २७.३ षटकात १० गडी बाद १४७ धावा (समर्थ धावरे ३४, शिवम पाटील ३०, अभिमन्यु सिंग २२, रझ्झाक ३-३२, रेयान मोमीन ३-५४, अर्थव मोरे २-२५); सामनावीरः रेयान मोमीन;

फोटो ओळीः एसएम क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि बीएस्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी यांच्या सामन्यातील क्षण.
फोटो १ आणि २: एसएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा फलंदाज रेयान मोमीन, बीएस्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा गोलंदाज शिवम पाटील याच्या गोलंदाजीवर फटका मारताना.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!