‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांची आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धा

२२ यार्डस् अ‍ॅकॅडमी, वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

पुणे, १२ डिसेंबरः ट्वेन्टीफोर स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स करंडक’ १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब २५-२५ क्रिकेट स्पर्धेत २२ यार्डस् अ‍ॅकॅडमी आणि वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोविड पराशर याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर २२ यार्डस् अ‍ॅकॅडमीने फन फिटनेस अ‍ॅकॅडमीचा २१ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्‍या २२ यार्डस् अ‍ॅकॅडमीने २५ षटकात १६४ धावांचे लक्ष्य उभे केले. संकल्प सावंत याने २९ धावांची तर, अन्वित दावणगे याने २६ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना फन फिटनेस अ‍ॅकॅडमीचा डाव १४३ धावांवर मर्यादित राहीला. अभिनव मुंडे याने २२ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला. कोविड पराशर याने २ गडी तर, संकल्प सावंत याने १४ धावांत २ गडी बाद केले.

दर्श चनपुर याने केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा १० गडी राखून सहज पराभव केला. दर्श याने १२ धावांमध्ये ३ गडी बाद करून स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा डाव ८४ धावांवर गुंडाळला. सत्विक बोंबले आणि युनूस खान यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला. हे लक्ष्य वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ८.१ षटकात पूर्ण केले. रूद्र भोसले याने ३८ धावांची तर, सिद्धांत लांडे याने २४ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
२२ यार्डस् अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ८ गडी बाद १६४ धावा (संकल्प सावंत २९, अन्वित दावणगे २६, अव्देत ओरसे २-४२, मानव वाघचौरे २-१६) वि.वि. फन फिटनेस अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ९ गडी बाद १४३ धावा (अभिनव मुंडे २२, यथार्थ परदशी १४, कोविड पराशर २-३२, संकल्प सावंत २-१४); सामनावीरः कोविड पराशर;

स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः २२.४ षटकात १० गडी बाद ८४ धावा (अनुज खराडे २६, इशान माळी १०, दर्श चनपुर ३-१२, सत्विक बोंबले १-६, युनूस खान १-५) पराभूत वि. वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ८.१ षटकात बिन बाद ८६ धावा (रूद्र भोसले नाबाद ३८, सिद्धांत लांडे नाबाद २४); सामनावीरः दर्श चनपुर;

फोटो ओळीः स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब आणि वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी यांच्या सामन्यातील क्षण.
फोटो १ आणि २: स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा फलंदाज विराज कदम हा वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा गोलंदाज युनूस खान याच्या गोलंदाजीवर फटका मारताना.

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!