एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर राष्ट्रीय स्पर्धेचे १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजन !!
पुणेकर अनुभवणार देशातील सर्वोत्तम रायडर्सचा डर्ट-रेसिंगच्या अंतिम फेरीचा थरार !!
रॅली रेसिंगसाठी कोणतेही प्रवेश-शुल्क नाही, सर्व क्रिडारसिकांना मोफत प्रवेश !!
पुणे, १० डिसेंबरः फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या भारतातील मोटरस्पोटर्सच्या राष्ट्रीय प्रशासकीय संस्थेच्या मान्यतेखाली होणार्या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप राष्ट्रीय स्पर्धेची अंतिम आणि निर्णायक फेरी पुण्यामध्ये होणार आहे. भारतातील अव्वल आणि सर्वोत्तम रायडर्स या राष्ट्रीय विजेता ठरवणार्या फायनलमध्ये सहभागी होणार असून या टु-व्हिलरच्या डर्ट-रेस चा (मातीवरच्या शर्यतीचा) थरार पुणेकरांना अनुभवता येणार आहे. रॅली रेसिंगसाठी कोणतेही प्रवेश-शुल्क आकारण्यात येणार नसून सर्व क्रिडारसिकांना मोफत प्रवेश आहे. ही रॅली रेसिंग पुण्याजवळील कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे होणार आहे.
या रोमांचकारी स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक तसेच ३ वेळेचा राष्ट्रीय रॅली चॅम्पियन आणि मानांकित ग्रेट डेझर्ट हिमालयन रॅलीजचा विजेता फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना यांनी सांगितले की, २०२४ मध्ये देशातील विविध रांज्यांमध्ये झालेल्या ५ प्राथमिक फेर्यांनंतर या स्पर्धेची राष्ट्रीय अंतिम फेरी १४ आणि १५ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. या फायनल राऊंडसाठी प्रत्येक झोनमधून पात्र झालेले सुमारे १५० अव्वल रायडर्स सहभागी होणार असून या स्पर्धेत राष्ट्रीय अजिंक्यपद विजेता ठरणार आहे. मातीवरचा, तीव्र चढ-उतार असलेला ट्रॅक आणि त्यावर विविध प्रकारच्या हायस्पीड-सुपर पॉवर असलेल्या बाईक्स् आणि यामध्ये वेग आणि अडथळे पार करणार्या रायडर्सची रोमांचकारी शर्यतीचा अनुभव मिळणार आहे.
पुण्यामध्ये होणार्या अंतिम स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना फराद आणि चिन्मय म्हणाले की, राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेले सचिन डी., नटराज, असद खान, रेहाना, सिनान फ्रान्सीस, राजेंद्र, स्टेफन रॉय, शामिम खान आणि सय्यद असिफ अलि हे विजेतेपदासाठी झुंझणार आहेत. याशिवाय सुहैल अहमद, युवा कुमार, अमोद नाग, मुंबईचा बादल दोशी, पुण्यातील पिंकेश ठक्कर, हंसराज साईकिया, मधुरीया ज्योती राभा, बंटेलांग जयव्रा असे अव्वल आणि सर्वोत्तम १५० हून अधिक रायडर्स सहभागी होणार आहेत.
फराद भातेना हे स्वतः सुप्रसिध्द रॅली ड्रायव्हर असून त्याला भारतीय मोटर स्पोटर्स सर्कलमध्ये ‘बीग फुट’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे हे कुटूंब मोटरस्पोटर्स आयकॉन्स् म्हणून ओळखले जाते. फराद याने भारत आणि दक्षिण-पुर्व आशियातील २०० हून अधिक रॅली आणि शर्यतींमध्ये भाग घेतला आहे.