• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

‘डी.एस.के. करंडक’ आंतर-शालेय क्रिडा स्पर्धा

डीएसके स्कूल, ट्री हाऊस स्कूल खो-खो स्पर्धेत विजेतेपद !!

१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत डीएसके स्कूलचे वर्चस्व !!

 

पुणे, १२ डिसेंबरः डी.एस.के. स्कूल, धायरी तर्फे आयोजित सहाव्या ‘डी.एस.के. करंडक’ आंतर-शालेय क्रिडा स्पर्धेत खो-खो क्रीडाप्रकारामध्ये डीएसके स्कूल संघाने मुलांमध्ये तर, मुलीमध्ये ट्री हाऊस शाळेने विजेतेपद संपादन केले. १४ वर्षाखालील गटातील मुले आणि मुलींच्या १०० मीटर धावण्याची शर्यतीमध्ये डीएसके स्कूलने वर्चस्व गाजवले.

स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या अध्यक्षा हेमंती कुलकर्णी, मुख्याध्यापिका जयश्री मुळे, वरिष्ठ पत्रकार मिलींद ढमढेरे, प्राध्यापक नंदकुमार कार्कीडे यांच्या उपस्थितीत झाले. आचार्य विजय वल्लभ शाळा, ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूल, डॉ. सायरस इंग्लिश मिडीयम स्कूल, हॉरीझॉन स्कूल, नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल, एसपीएम स्कूल, सिंहगड सिटी स्कूल, सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, सेंट हेलेना स्कूल, सेंट मेरीज् स्कूल, ट्री हाऊस स्कूल, विश्व भारती स्कूल, वॉलनट स्कूल, सीएम इंटरनॅशनल स्कूल, ब्लॉसम पब्लिक स्कूल अशा पुण्यामधील एकूण ३० शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत अ‍ॅथलेटीकक्स् (धावणे, अडथळा शर्यत) या वैयक्तिक क्रिडा प्रकारांसह खो-खो, डॉजबॉल आणि बास्केटबॉल या सांघिक स्पर्धांचा समावेश आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मुळे यांनी आपल्या मनोगतामध्ये खेळातील मुल्य आणि तत्वे यांचे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कशा पध्दतीने महत्वाचे ठरतात, या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मैदानी खेळाचे महत्व, खेळातील सांघिक भावना आणि नैतिकता याचे जतन करीत जीवनामध्ये यशस्वी होण्याची प्रेरणा आणि उर्जा कशाप्रकारचे साध्य होईल, याविषयी अध्यक्षा हेमंती कुलकर्णी यांनी सांगितले. खेळांचे गुण अंगिकारल्याने जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो, असे त्यांनी नमूद केले.

खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डीएसके स्कूलने ट्री हाऊस स्कूलचा १०-४ अशा गुणफरकाने पराभव करून विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटामध्ये ट्री हाऊस शाळेने सी.एम. इंटरनॅशनल शाळेचा १८-६ असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. १४ वर्षाखालील गटातील मुले आणि मुलींच्या १०० मीटर धावण्याची शर्यतीमध्ये डीएसके स्कूलने वर्चस्व गाजवले. मुलींमध्ये स्वनिका जोशी (१६.२० से.); आदिती कुशवाह (१६.४५ से.), रितु सुडाके (१६.५० से.) यांनी पहिले तीन क्रमांक मिळवले. मुलांमध्ये इशान सुरवसे (११.७७ से.), आदित्य माने (१३.०५ से.) आणि शौर्य भावसार (१३.६८ से.) यांनी अव्वल क्रमांक मिळवला.

स्पर्धेचे निकालः सांघिक क्रीडाप्रकारः
खो-खोः अंतिम सामनाः १४ वर्षाखालील गटः
मुलेः डीएसके स्कूलः १० (रजत शेलार १.२० मि., राध्ये पाडोळे १.१० मि., मानस कांबळे १.०० मि., अभिज्ञ फाळके २ गुण, तनिष्क शिंपी २ गुण, चैतन्य कुलकर्णी २ गुण) वि.वि. ट्री हाऊसः ४ (मानस चोरगे १.२० मि., रूद्र गदेड ०.४० मि., मानस चोरगे २ गुण, शाम फाळे २ गुण);

मुलीः ट्री हाऊसः १८ (स्वरा पवार १.२० मि., आस्था पाथकर १.०० मि., मैत्रियी बारसावडे १.१० मि., प्रणवी सणस २ गुण, आर्या जाधव ३ गुण, दारवा पवार २ गुण) वि.वि. सी.एम. इंटरनॅशनलः ६ (अपुर्वा आवारे १.१० मि., स्नेहल जाधव १.२० मि., सराह पानसरे २ गुण, रेवा श्रृगांरपुरे ३ गुण, सिद्धी जाधव १ गुण);

अ‍ॅथलेटीक्स्ः १०० मी. धावण्याची शर्यतः १४ वर्षाखालील गटः मुलेः इशान सुरवसे (११.७७ से., डीएसके स्कूल), आदित्य माने (१३.०५ से., डीएसके स्कूल), शौर्य भावसार (१३.६८ से., डीएसके स्कूल);
१०० मी. धावण्याची शर्यतः १४ वर्षाखालील गटः मुलीः स्वनिका जोशी (१६.२० से.); आदिती कुशवाह (१६.४५ से.), रितु सुडाके (१६.५० से.); (सर्व मुली डीएसके स्कूल);

फोटो ओळीः डी.एस.के. स्कूल, धायरी तर्फे आयोजित सहाव्या ‘डी.एस.के. करंडक’ आंतर-शालेय क्रिडा स्पर्धेतील क्षणचित्रे.

फोटो १: १४ वर्षाखालील गटातील मुलींच्या १०० मीटर धावण्याची शर्यतीतील एक क्षण.
फोटो २: १४ वर्षाखालील गटातील मुलांच्या १०० मीटर धावण्याची शर्यतीतील एक क्षण.
फोटो ३ आणि ४: स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सांघिक कसरतींचे प्रात्यक्क्षीक दाखावताना मुले.

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!