‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा

विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमी, टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमी संघांचे दमदार विजय !!

पुणे, २५ नोव्हेंबरः स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘स्पोटर्सफिल्ड अजिंक्यपद करंडक’ १७ वर्षाखालील आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा मोठ्या धावसंख्यांनी पराभव करून स्पर्धेत दमरदा विजय मिळवले.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत शिवम गोरे याने फटकावलेल्या नाबाद १०३ धावांच्या जोरावर विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीने क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा १९८ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ४६ षटकामध्ये २९९ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये शिवम गोरे याने नाबाद १०३ धावांची तर, प्रेम ईघे याने ७२ धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा डाव १०१ धावांवर मर्यादितर राहीला. फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही कमाल दाखवताना शिवम याने ४ धावात ४ गडी टिपले.

दुसर्‍या सामन्यामध्ये आयुष देवकर याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघाचा २०३ धावांनी सहज धुव्वा उडविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमी संघाने ५० षटकात ४०० धावांची विशाल धावसंख्या उभी केली. आयुष देवकर (७२ धावा), कुमार वर्मा (६१ धावा), स्वरूप खाडे (५९ धावा) या फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली तर, अमोघ रोडगे (४६ धावा) आणि केविन सोनिग्रा (४२ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा डाव १९७ धावांवर मर्यादित राहीला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ४६ षटकात ६ गडी बाद २९९ धावा (शिवम गोरे नाबाद १०३ (११७, १५ चौकार), प्रेम ईघे ७२, आयुष म्हाळासकर २७, तनिष्क जैन ३-४०) वि.वि. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः ३३.१ षटकात १० गडी बाद १०१ धावा (शौर्य देशमुख ३३, शुभम महाडीक २७, शिवम गोरे ४-४, सचिन यादव ३-५); सामनावीरः शिवम गोरे;

टेंभेकर फार्म्स अ‍ॅकॅडमीः ५० षटकात ८ गडी बाद ४०० धावा (आयुष देवकर ७२, कुमार वर्मा ६१, स्वरूप खाडे ५९, अमोघ रोडगे ४६,केविन सोनिग्रा ४२, यश कोंढाळकर ३-४६) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः ४६.३ षटकात १० गडी बाद १९७ धावा (ओम थोरात ४५, विवेक पलांगे २९, साईराज दुरकर २३, आयुष देवकर ३-३७, प्रणव नानेकर २-३१); सामनावीरः आयुष देवकर;

फोटो ओळीः विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी यांच्या सामन्यातील क्षण.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!