दुसरी ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’फुटबॉल स्पर्धा !!
टायगर्स इलेव्हन संघांचे दोन्ही गटात विजय !!
पुणे, २५ नोव्हेंबरः डेक्कन इलेव्हन क्लबच्यावतीने आयोजित दुसर्या ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या १२ आणि १५ वर्षाखालील गटामध्ये टायगर्स इलेव्हन संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा सहज पराभव करून आगेकूच केली.
कर्वेनगर येथील सेवासदन शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत १२ वर्षाखालील गटामध्ये राजेश एम. याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर टायगर्स इलेव्हन संघाने वुल्व्हज् इलेव्हन संघाचा १-० असा सहज पराभव केला. राजेश याने सामन्यामध्ये एकमेव गोल नोंदविताना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. दुसर्या सामन्यामध्ये रेवांश कासट याने केलेल्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर रायनोज् इलेव्हन संघाने डॉल्फिन्स् इलेव्हनचा १-० असा पराभव केला.
याच गटातील चुरशीच्या झालेल्या बुल्स् इलेव्हन आणि स्कॉर्पियन इलेव्हन यांच्यातील सामना २-२ अशा बरोबरीतमध्ये सुटला. सामन्यात बुल्स् इलेव्हन संघाकडून अन्वित केळकर आणि संपदा वेलणकर यांनी तर, स्कॉर्पियन इलेव्हनकडून श्रीनिवास नारवेकर व आनंदी मोघे यांनी गोल नोंदविले.
१५ वर्षाखालील गटामध्ये नकुल हार्डीकर आणि मैत्रई बिराजदार यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर टायगर्स इलेव्हन संघाने डॉल्फिन्स् इलेव्हन संघाचा २-० असा पराभव करून आगेकूच केली.
गटसाखळी फेरीः १२ वर्षाखालील गटः
बुल्स् इलेव्हनः २ (अन्वित केळकर ७ मि., संपदा वेलणकर १५ मि.) बरोबरी वि. स्कॉर्पियन इलेव्हनः २ (श्रीनिवास नारवेकर २ मि., आनंदी मोघे १८ मि.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः संपदा वेलणकर;
टायगर्स इलेव्हनः १ (राजेश एम. ९ मि.) वि.वि. वुल्व्हज् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः राजेश एम.;
रायनोज् इलेव्हनः १ (रेवांश कासट १२ मि.) वि.वि. डॉल्फिन्स् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः रेवांश कासट;
१५ वर्षाखालील गटः
टायगर्स इलेव्हनः २ (नकुल हार्डीकर ५ मि., मैत्रई बिराजदार १८ मि.) वि.वि. डॉल्फिन्स् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः नकुल हार्डीकर.