• Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

‘एमएआर लीग’ अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धा !!

वॉरीयर टायटन्स्, अनस्टॉपेबल इलेव्हन, लिजंड्स इलेव्हन, ग्रीन पार्क संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

 

पुणे, २० नोव्हेंबरः ‘एमएआर लीग’ अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत वॉरीयर टायटन्स्, अनस्टॉपेबल इलेव्हन, लिजंड्स इलेव्हन, ग्रीन पार्क या संघांंनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

लोहगांव येथील रन-३६० टर्फ मैदानावर झालेल्या या स्पर्धेत रोशन पी. याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे अनस्टॉपेबल इलेव्हनने वॉरीयर टायटन्स्चा ९ गडी राखून सहज पराभव केला. दुसर्‍या सामन्यात प्रशांत गोडीयाल याने केलेल्या ५५ धावांच्या मदतीने वॉरीयर टायटन्स्ने ग्रीन पार्क संघाचा १७ धावांनी पराभव केला. आणखी एका सामन्यात वैंकटेश राठोड याने केलेल्या ४६ धावांच्या मदतीने वॉरीयर टायटन्स्ने इनव्हिजन क्लबचा १० धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदविला.

शंकर सोळुंके याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर लिजंड्स इलेव्हनने इनव्हिजन क्लबचा ९ धावांनी निसटता पराभव केला. नारायण रात्रे याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर लिजंड्स इलेव्हनने सीडी इलेव्हन संघाचा ६ गडी राखून पराभव केला. प्रथम खांडवे याने केलेल्या नाबाद ५२ धावांच्या जोरावर ग्रीन पार्क संघाने लिजंड्स इलेव्हन संघाचा ८ गडी राखून पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे संचालक अजय नायर आणि सुमित बिजलानी यांच्या हस्ते करण्यात आले.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
वॉरीयर टायटन्स्ः ८ षटकात ६ गडी बाद ६८ धावा (अभ्यास त्यागी २७, ओंकार गायकवाड १४, सर्वेश ओझा १-२) पराभूत वि. अनस्टॉपेबल इलेव्हनः ४.३ षटकात १ गडी बाद ७४ धावा (रोशन पी. ५० (१८, ३ चौकार, ६ षटकार), सर्वेश ओझा १८); रोशन पी.;

वॉरीयर टायटन्स्ः ८ षटकात ५ गडी बाद १०३ धावा (प्रशांत गोडीयाल ५५ (१९, ५ चौकार, ५ षटकार), पार्था वटी २५, तेजस खिरीड २-१२) वि.वि. ग्रीन पार्क क्लबः ८ षटकात ६ गडी बाद ८६ धावा (अनिकेत माने २६, प्रशांत शर्मा १६, राहूल ववधाने २-११); सामनावीरः प्रशांत गोडीयाल;

लिजंड्स इलेव्हनः ८ षटकात ५ गडी बाद ७८ धावा (राठोड सिंग २३, कार्तिक वनझरा २२, श्रीकांत महाडीक ३-२३) वि.वि. इनव्हिजन क्लबः ८ षटकात ५ गडी बाद ६९ धावा (पंकज गंत्रा ३६, धीरज गवळे २६, शंकर सोळुंके ३-१); सामनावीरः शंकर सोळुंके;

सीडी इलेव्हनः ८ षटकात ६ गडी बाद ८२ धावा (कौस्तुभ दातार ३३, नारायण रात्रे २-१९) पराभूत वि. लिजंड्स इलेव्हनः ७.४ षटकात ४ गडी बाद ८३ धावा (सुधीर सिंग ३१, अदिभ गजभिये २४, इंद्रकांत भार्गव ३-१५); सामनावीरः नारायण रात्रे;

वॉरीयर टायटन्स्ः ८ षटकात ६ गडी बाद ९४ धावा (वैंकटेश राठोड ४६ (१९, ३ चौकार, ५ षटकार), मनु सक्सेना २२, सागर पाटील २-१६) वि.वि. इनव्हिजन क्लबः ८ षटकात ३ गडी बाद ८४ धावा (महेश महाजन ४६, विक्रांत तांदळे ३१, ओंकार गायकवाड २-१६); सामनावीरः वैंकटेश राठोड;

लिजंड्स इलेव्हनः ८ षटकात ९ गडी बाद ८० धावा (शंकर सोळुंखे ५० (२१, ८ चौकार, २ षटकार), तेजस खिरीड ३-८, प्रथम शर्मा ३-१९) पराभूत वि. ग्रीन पार्कः ५.३ षटकात २ गडी बाद ८३ धावा (प्रथम खांडवे नाबाद ५२ (१७, ३ चौकार, ६ षटकार), राज राठोड २२); सामनावीरः प्रथम खांडवे.

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!