दुसरी ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’फुटबॉल स्पर्धा !!

 

डॉल्फिन्स् इलेव्हन, बुल्स् इलेव्हन संघांची विजयी कामगिरी !!

 

पुणे, २१ नोव्हेंबरः पुण्यातील मानांकित आणि ४० वर्ष जुना व आपला इतिहास असलेल्या डेक्कन इलेव्हन क्लबच्यावतीने आयोजित दुसर्‍या ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’ फुटबॉल स्पर्धेच्या ८ वर्षाखालील गटामध्ये डॉल्फिन्स् इलेव्हन आणि बुल्स् इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

कर्वेनगर येथील सेवासदन शाळेच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत ८ वर्षाखालील गटामध्ये डॉल्फिन्स् इलेव्हन संघाने स्कॉर्पियन्स् इलेव्हनचा ४-१ असा सहज पराभव केला. डॉल्फिन्स् इलेव्हन संघानकडून लव साबळे याने दोन गोल तर, स्वनिक के. आणि आरूष बी. यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. दुसर्‍या सामन्यामध्ये बुल्स् इलेव्हनने टायगर्स इलेव्हनचा ४-३ असा निसटता पराभव केला. बुल्स् इलेव्हनकडून केहान के. आणि आरव जी. यांनी प्रत्येकी दोन गोल केले. टायगर्स इलेव्हनकडून नील फिरोदीया याने दोन तर, आरूष प्रभुदेसाई याने एक गोल केला.

१२ वर्षाखालील गटामध्ये अन्वित केळकर आणि रियान एस. यांनी केलेल्या गोलच्या जोरावर बुल्स् इलेव्हनने डॉल्फिन्स् इलेव्हनचा २-१ असा पराभव केला. आदित्य दाते याने केलेल्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर वुल्व्हज् इलेव्हनने स्कॉर्पियन्स् इलेव्हनचा १-० असा पराभव केला. ओजस पारखी याने केलेल्या गोलाच्या जोरावर रायनोज् इलेव्हनने टायगर्स इलेव्हनचा १-० असा पराभव करून आगेकूच केली.

गटसाखळी फेरीः १२ वर्षाखालील गटः
बुल्स् इलेव्हनः २ (अन्वित केळकर ९ मि., रियान एस. १८ मि.) वि.वि. डॉल्फिन्स् इलेव्हनः १ (निर्मित भट्टड १४ मि.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः हिमांशु बि. (बुल्स् इलेव्हन);
वुल्व्हज् इलेव्हनः १ (आदित्य दाते ९ मि.) वि.वि. स्कॉर्पियन्स् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः रूग्वेद जी.;
रायनोज् इलेव्हनः १ (ओजस पारखी ७ मि.) वि.वि. टायगर्स इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः ओजस पारखी;

८ वर्षाखालील गटः
डॉल्फिन्स् इलेव्हनः ४ (स्वनिक के. ८ मि., लव साबळे १०, १४ मि. आरूष बी. २१ मि.) वि.वि. स्कॉर्पियन्स् इलेव्हनः १ (स्वयंगोल ६ मि.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः स्वनिक के.;
बुल्स् इलेव्हनः ४ (केहान के. २, १८ मि., आरव जी. ८ मि., २२ मि.) वि.वि. टायगर्स इलेव्हनः ३ (नील फिरोदीया ५ मि., २० मि., आरूष प्रभुदेसाई १६ मि.); सर्वोत्कृष्ट खेळाडूः आरव जी.;

१५ वर्षाखालील गटः स्कॉर्पियन्स् इलेव्हनः ० बरोबरी वि. डॉल्फिन्स् इलेव्हनः ०; सर्वोत्कृष्ट खेळाडूः रूचिर देशपांडे (स्कॉर्पियन्स् इलेव्हन);

फोटो ओळीः रायनोज् इलेव्हन (निळा) आणि टायगर्स इलेव्हन (लाल आणि जांभळा) यांच्या सामन्यातील क्षण.

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • reddit
  • LinkedIn
  • Blogger

Pin It on Pinterest

Share This

Share This

Share this post with your friends!